सातारा जिल्ह्यातून चौघेजण गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:42+5:302021-06-27T04:25:42+5:30
सातारा: जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसांत चौघेजण गायब झाले असल्याच्या तक्रारी फलटण, बोरगाव आणि कराड तालुका या तीन पोलीस ...

सातारा जिल्ह्यातून चौघेजण गायब
सातारा: जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसांत चौघेजण गायब झाले असल्याच्या तक्रारी फलटण, बोरगाव आणि कराड तालुका या तीन पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. गायब झालेल्यांमध्ये दोन महिला, एक युवती, बालकाचा समावेश आहेत. दरम्यान, कोरोना महामारीतच चौघेजण गायब झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील विडणी येथील अब्दागिरे वस्तीवरील राहत्या घरातून स्वाती हरिभाऊ अब्दागिरे (वय १८ वर्षे ५ महिने) ही निघून गेली आहे. दि. २३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ती शाळेच्या कामाच्यानिमित्ताने मैत्रिणीकडे जाऊन येते, असे आईला सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, ती अजूनही परत आलेली नाही. याप्रकरणी तिच्या नातेवाइकांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक घोंगडे करत आहेत.
सातारा तालुक्यातील सोनापूर येथील नीता पांडुरंग बागल (वय २९) ही महिला दि. २३ रोजी सकाळी साडेआठ ते सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेली आहे. याप्रकरणी तिच्या नातेवाइकांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.
कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथून राणी श्रीरंग सरगर (वय २३) आणि आदर्श श्रीरंग सरगर (वय ४) हे दोघे मायलेक कोणाला काहीएक न सांगता दि. २२ रोजी सायंकाळी सात वाजता घरातून निघून गेले आहेत. ते अजूनही परत न आल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जगदाळे करत आहेत.