शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Satara Crime: भवानवाडीत भांडणातून गोळीबार; फिर्यादीने चपळाई केली अन् बंदूक वर ढकलून गोळी चुकवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:20 IST

संशयित दोन तासांत जेरबंद

सातारा : भवानवाडी, ता. कऱ्हाड येथे भांडणातून चार जणांनी फिर्यादीला दमदाटी करून सिंगल बोर बंदुकीतून गोळी झाडली. सुदैवाने फिर्यादीने चपळाईने बंदुकीचा बॅरल वर ढकलल्याने राऊंड कानाजवळून गेला. यानंतर चाैघांनी फिर्यादीच्या कामगारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व हवेत चार राउंड फायर केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलिसांनी दोन तासांत संशयितांना अटक करून १ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत केला.याबाबत माहिती अशी, फिर्यादी यांच्या ऊसतोड कामगारात आणि संशयित मकरंद गुलाब सूर्यवंशीचा ट्रॅक्टर चालक पाखऱ्या यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दि. १८ रोजी रात्री ८.३० वाजता सुमारास भवानवाडी, ता. कऱ्हाडच्या हद्दीत सोन्या ऊर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी, मकरंद गुलाब सूर्यवंशी दोघे रा. सूर्यवंशी मळा, चरेगाव, ता. कऱ्हाड, पुंजाराम सुखदेव पाखरे रा. सूर्यवंशी मळा, चरेगाव, मूळ रा. पोकळवड, ता. जालना, राज अंकुश आवळे रा. खालकरवाडी ता. कऱ्हाड हे सर्व आले.यावेळी सोन्या ऊर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी याने सिंगल बोर बंदुकीने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर फायर केला. यावेळी फिर्यादीने बंदुकीचा बॅरल वर ढकलल्याने राऊंड त्याच्या कानाजवळून गेला. यानंतर मकरंद सूर्यवंशी व पुंजाराम पाखरे यांनी फिर्यादीचे ऊसतोड कामगार मुकेश पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ऋषिकेश सूर्यवंशीने हवेत बंदुकीतून चार राऊंड फायर करून दहशत केली. संशयितांनी फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रार दाखल होताच उंब्रज पोलिसांनी भवानवाडी, खालकरवाडी, चरेगाव भागामध्ये पेट्रोलिंग करून संशयितांना दोन तासांत अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बंदूक, रिकाम्या पुंगळ्या व मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे करीत आहेत.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती द्यावीया घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी नागरिकांना अवैध शस्त्र बाळगण्याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अवैध शस्त्र कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी बाळगू नये, असेही सूचित केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस