शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: मराठीत बोलत नाही म्हणून हॉटेल कामगारांना मारहाण, तिघे जखमी; चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:54 IST

कऱ्हाड (जि.सातारा) : मराठी बोलता येत नसल्याच्या कारणावरून चौघांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापकासह वेटर आणि आचाऱ्याला लोखंडी पाइपने मारहाण केली. ...

कऱ्हाड (जि.सातारा) : मराठी बोलता येत नसल्याच्या कारणावरून चौघांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापकासह वेटर आणि आचाऱ्याला लोखंडी पाइपने मारहाण केली. बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड) येथील हॉटेल राजस्थानी येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत हॉटेल व्यवस्थापक प्रल्हाद गोबरलाल परमार (मूळ रा. कानेलाव, पो. कुर्णा, ता.जि. पार्ली, राजस्थान) यांनी तळबीड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अविनाश कृष्णात निकम, प्रज्ज्वल तुकाराम निकम, दीपक दत्तात्रय लोकरे, गौरव मधुकर रावते (सर्वजण रा. इंदोली, ता. कऱ्हाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.बेलवडे हवेली गावच्या हद्दीत असलेले हॉटेल राजस्थानी हे बिरू लुबाराम चौहान यांनी चालविण्यास घेतले आहे. त्याठिकाणी प्रल्हाद परमार हे व्यवस्थापक म्हणून प्रल्हाद बुधाराम कुमार हे वेटर म्हणून तर सुरेश गोबरलाल परमार हे आचारी म्हणून काम पाहतात. दोन दिवसांपूर्वी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करीत असताना चार युवक दुचाकीवरून त्याठिकाणी आले. त्यांनी जेवण आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी व्यवस्थापक प्रल्हाद परमार यांनी मला मराठी समजत नाही हिंदीमध्ये बोला, असे सांगितले. त्यावेळी एका युवकाने तू मराठीत बोल नाही तर तुला सोडणार नाही, असे म्हणून हुज्जत घातली. त्यानंतर चौघांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापक प्रल्हाद परमार यांना तुम्हाला मस्ती आली आहे, असे म्हणत लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यामध्ये प्रल्हाद परमार हे गंभीर जखमी झाले. सुरेश परमार आणि प्रल्हाद कुमार हे भांडण सोडवण्यासाठी त्याठिकाणी आले असता संबंधित युवकांनी त्यांनाही लोखंडी पाइप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.युवकांनी हॉटेलमध्ये घुसून मारहाण व तोडफोड केल्यानंतर आरडाओरडा झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. ग्रामस्थांना पाहताच युवकांनी लोखंडी पाईप तेथेच टाकून पळ काढला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस