शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात तीन अपघातांत चार ठार; पाच जखमी; अपघातांना ट्रक कारणीभूत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:56 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात विविध तीन ठिकाणी झालेल्या अपघातांत चार ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात विविध तीन ठिकाणी झालेल्या अपघातांत चार ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे अपघात रविवारी दिवसभरात झाले.साताऱ्यातून पुण्याला ईदची खरेदी करण्यासाठी शेख आणि मोमीन कुटुंबीय कारने निघाले होते. हे सर्व जण सकाळी घरातून बाहेर पडले. सलमान पठाण (वय २३, रा. मेढा, ता. जावळी) हा कार चालवत होता. पाचवड येथे त्यांची कार पोहोचली असता महामार्गालगत एक ट्रक उभा होता. या ट्रकला त्यांच्या कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. यात नाहीद जमीर शेख (३८, रा. शनिवार पेठ, सातारा), सलमा इरफान मोमीन (४१, रा. सांगली) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर कैफ इरफान मोमीन (१४), इरफान इकबाल मोमीन (४०, दोघेही रा. सांगली), बशीर महामूद शेख (७३, रा. शनिवार पेठ, सातारा) आणि चालक सलमान पठाण हे जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुसरा अपघात शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत दुपारी तीनच्या सुमारास झाला. दिगंबर मनोज शिंदे (वय २२, रा. तामकणे, ता. पाटण), योगिनी काशिनाथ जाधव (१७, रा. निवकणे, ता. पाटण) हे दोघे दुचाकीवरून साताऱ्याकडे येत होते. शेंद्रेजवळ आल्यानंतर चुकीच्या दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात दिगंबर शिंदे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर योगिनी जाधव गंभीर जखमी झाली. अपघातानंतर रुग्णवाहिकेने दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सिव्हिलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर योगिनी हिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलविले.

तिसरा अपघात सातारा बसस्थानकासमोर सायंकाळी पाच वाजता झाला. शिवाजी राजाराम मोरे (४२, रा. राकुसलेवाडी, ता. सातारा) हे दुचाकीवरून पोवई नाक्याकडे निघाले होते. बसस्थानकासमोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला शेजारून जाणाऱ्या अन्य एका दुचाकीची धडक बसली. यात ते खाली पडले. याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताला तीन ट्रक कारणीभूत..रविवारी दिवसभरात तीन अपघात झाले. या तिन्ही अपघातांना ट्रक कारणीभूत झाले. सातारा शहरात वर्दळीच्या ठिकाणी मालट्रकने प्रवेश केल्याने अपघात झाला. तर शेंद्रेजवळ चुकीच्या दिशेने ट्रकचालकाने येऊन दुचाकीस्वाराला उडवले. पाचवडमध्येही उभ्या ट्रकला पाठीमागून कार धडकून दोन महिलांना जीव गमवावा लागला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू