शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Accident: इस्लामपूर जवळ तिहेरी अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 20:12 IST

नातेवाईकांकडे वास्तुशांती समारंभासाठी निघाले असता पोळ कुटुंबीयावर काळाने घाला घातला.

मलकापूर : समोरील कारने अचानक ब्रेक लावल्याने कार थांबण्याचा प्रयत्न करत असतानाच पाठीमागून डंपरने कारला जोराची धडक दिली. इस्लामपूर जवळ झालेल्या या तिहेरी अपघात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर सात वर्षाच्या चिमुकलीसह एक महिला गंभीर जखमी झाली.अपघात मृत झालेले कराड तालुक्यातील आगाशिवनगर, मलकापूर येथील आहेत. नातेवाईकांकडे वास्तुशांती समारंभासाठी निघाले असता पोळ कुटुंबीयावर काळाने घाला घातला. या अपघाताची माहिती मिळताच आगाशिवनगरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.कार चालक  अधिकराव जगन्नाथ पोळ (वय ४९), आई  गिताबाई जगन्नाथ पोळ (७०), पत्नी  सुषमा अधिकराव पोळ हे तिघे मृत झाले. तर, भावजय  सरीता सुभाष पोळ (३५) व भावाची मुलगी  समृद्धी सुभाष पोळ (७, सर्व रा. पोळवस्ती, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) या गंभीर जखमी झाल्या आहेत.याबाबत माहिती अशी की, आगाशिवनगर येथील पोळ कुटुंबीय नातेवाईकाच्या घरांच्या वास्तुशांती समारंभासाठी आज सकाळी कारमधून सांगलीकडे निघाले होते. यावेळी अधिकराव पोळ यांच्यासह त्यांची पत्नी, आई, पुतणी व भाऊजी असे पाच जण कार मधून निघाले होते. ते पेठ नाका ते इस्लामपूर मार्गे सांगलीकडे जात असताना इस्लामपूर जवळ समोरील कार चालकाने अचानक ब्रेक मारला. यावेळी पोळ यांनीही त्वरित ब्रेक मारून आपली कार थांबवण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे ठार झाले. तर चिमुकलीसह महिला गंभीर जखमी झाली. जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आगाशिवनगरमधील अधिकराव पोळ यांचे इतर नातेवाईक, कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयांमध्येही नातेवाईकांसह मित्रपरिवाराने गर्दी केली होती. या घटनेमुळे आगाशिवनगरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीAccidentअपघात