विहिरीत बुडाल्याने चार मुलांचा मृत्यू

By Admin | Updated: March 23, 2017 20:42 IST2017-03-23T20:42:13+5:302017-03-23T20:42:13+5:30

सातारा तालुक्यातील तासगाव (मुळीकवाडी) येथील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा

Four children die due to drowning in well | विहिरीत बुडाल्याने चार मुलांचा मृत्यू

विहिरीत बुडाल्याने चार मुलांचा मृत्यू

>आॅनलाईन लोकमत
अंगापूर (सातारा), दि. 23 - सातारा तालुक्यातील तासगाव (मुळीकवाडी) येथील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. सिद्धार्थ संतोष कांबळे (११), अक्षय विश्वास कारभोळ (१२), करण सुनील कांबळे (११), राजरत्न सुनील कांबळे (१३) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. करण आणि राजरत्न ही सख्खी भावंडे आहेत. 

Web Title: Four children die due to drowning in well