शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

चोरट्याकडून 4 दुचाकी जप्त, पोलिसी खाक्या दाखवताच तोंड उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 21:53 IST

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते.

सातारा : सातारा तालुक्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जितेंद्र उर्फ बबन हिंदूराव मोरे (वय २३, रा. गजवडी, ता. सातारा) याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. एक युवक विविध प्रकारच्या दुचाकी वापरत असल्याची माहिती डीबी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, राजू मुलाणी, रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांना संबंधित युवकाला पकडण्यासाठी पाठविले. पोलिसांनी सापळा लावून गजवडी परिसरात युवकाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने जितेंद्र मोरे असे त्याचे नाव सांगितले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चार मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याने घराच्या परसिरात लपवून ठेवलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी त्याने शाहूपुरी आणि सातारा शहर परिसरातून चोरल्या असल्याचे तपासात पुढे आले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसरThiefचोर