शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

ट्रॅक्टर लावायचे, बोअरच्या मोटार काढून न्यायचे; साताऱ्यात शेतामधून चोरी करणाऱ्या चौघांना पकडले 

By नितीन काळेल | Updated: July 12, 2024 18:53 IST

सातारा : सातारा शहरालगतच्या खिंडवाडी परिसरातील शेतातून बोअरवेलमधील विद्युत मोटारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरुन नेणाऱ्या चाैघांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. ...

सातारा : सातारा शहरालगतच्या खिंडवाडी परिसरातील शेतातून बोअरवेलमधील विद्युत मोटारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरुन नेणाऱ्या चाैघांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. संशयित हे खिंडवाडी गावातीलच आहेत. पोलिसांनी संबंधितांकडून सुमारे साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार याप्रकरणी सुरज साहेबराव जाधव (वय ३१), प्रसाद उर्फ बंटी अनिल चव्हाण (वय २५), सुरज अशोक चव्हाण (वय २८) आणि विशाल संपत क्षीरसागर (वय २८, सर्वजण रा. खिंडवाडी सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खिंडवाडीमधील शेतकऱ्यांच्या बोअरमधील विद्युत मोटारी चोरीस जात होत्या. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल होता. या चोरीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार या पथकाने माहितीच्या आधारे चाैघांना खिंडवाडी परिसरातून ताब्यात घेतले. चाैघांनीही जानाई मळाई परिसरातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने बोअरवेलमधून विद्युत मोटारींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेला ट्रॅक्टर, तीन मोबाईल, विद्युत मोटार असा एकूण ६ लाख ६५ हजारांचा एेवज जप्त केला आहे.गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजीत भोसले, नीलेश यादव, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस