शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: दारू पिण्याचा परवाना नसणे चौघांना भोवले, तिघांवर गुन्हा दाखल

By दत्ता यादव | Updated: March 15, 2023 18:50 IST

पोलिसांकडून दखल घेण्यास सुरुवात

सातारा : सार्वजनिक ठिकाणी परवाना नसताना दारू पिणे चौघांच्या चांगलेच अंगलट आले असनू, याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर दारू बंदी अधिनियमानुसार ८५ (१) गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन घटना दहिवडी येथे तर एक घटना फलटण येथे घडली आहे.भाडळी, ता. फलटण गावच्या हद्दीतील जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी हणमंत बबन गोरे (वय ४०, रा. अर्धपित्री, ता. गेवराई, जि. बीड) हे दारू पित बसले होते. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस काॅन्स्टेबल रामदास पठाडे हे गस्त घालत असताना गोरे हे त्यांना दारू पित असताना सापडले. त्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा पोलिसांनी त्यांच्याकडे केली. मात्र, त्यांच्याकडे परवाना नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी घटना दहिवडीतील फलटण चाैकात सार्वजनिक ठिकाणी घडली. या रस्त्यावरून रमेश मेथूर ठाकूर (वय ३५, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) हा वाकडा-तिकडा चालत होता. पोलिसांनी त्याच्याकडे परवाना मागितला असता त्याच्याजवळ परवाना नसल्याचे समोर आले. तसेच ब्रेथ अॅनालायझर मशीनमध्ये त्याला फुंकर मारण्यास सांगितले. त्याने फुंकर मारल्याने मशीनमध्ये रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच चाैकात आणखी एक व्यक्ती रस्त्यावरून वाकडा-तिकडा चालताना दिसून आला. त्याचे नाव पोलिसांनी विचारले असता त्याने गणेश महादेव योगे (वय ३३, रा. मार्डी चाैक, दहिवडी, ता. माण, जि. सातारा) असे नाव सांगितले. त्याचाही अहवाल ब्रेथ अॅनालाझरमध्ये पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्यावरही दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून दखल घेण्यास सुरुवातसार्वजनिक दारू ठिकाणी दारू पिताना कोणी आढळून आल्यास पोलिस यापूर्वी कानाडोळा करत होते. परंतु आता पोलिसांकडून अशा मद्यपींवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मद्यपींची चांगलीच तंतरली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस