शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने माजी सैनिकाची फसवूणक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 11:26 AM

बॅकेत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने एका माजी सैनिकाची तब्बल साडेपाच लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देमुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने माजी सैनिकाची फसवूणकतिघांवर गुन्हा : साडेपाच लाख रुपये परत देण्यास टाळाटाळ

सातारा : बॅकेत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने एका माजी सैनिकाची तब्बल साडेपाच लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल यशवंत पिलावरे (वय ४०, रा. काळाराम मंदिरासमोर जंगीवाडा मंगळवार पेठ, सातारा), प्रसाद विष्णूपंत धोत्रे (वय ५५, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा), गायकवाड (पूर्ण नाव फिर्यादिला माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलास किसन जाधव (वय ५६, रा. करंडी, ता. सातारा) हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा रोहित याच्या नोकरीसाठी जाधव हे प्रयत्न करत होते. त्यांच्या गावातील दादा पिलावरे यांचा पुतण्या विशाल पिलावरे हा ओळखीचा झाला होता. त्याने सारस्वत बँकेत तुमच्या मुलाला नोकरीला लावतो. माझ्याकडे अशी पार्टी आहे, असे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैशाची तजवीज केली.

विशाल पिलावरेने विलास जाधव यांना गाडीतून मोळाचा ओढा येथे राहात असलेल्या प्रसाद धोत्रे याच्याकडे नेले. धोत्रे साहेब मंत्रालयात कामाला असतात. त्यांची ओळख आहे, यापूर्वी त्यांनी चार ते पाचजणांची कामे केली आहेत, असे पिलावरेने त्यांना सांगितले. त्यामुळे विलास जाधव यांनी त्यांना साडेपाच लाख रुपये दिले.

पैसे दिल्यानंतर तुमच्या मुलाला दोन महिन्यांत नोकरी लावून देतो, नोकरी नाही लागली तर पैसे परत देईन, असे सांगून त्याने आयसीआय बँकेचा धनादेशही जाधव यांच्याकडे दिला. परंतु दोन महिने उलटून गेल्यानंतर जाधव यांनी पिलावरे आणि धोत्रे यांच्याकडे मुलाला नोकरी कधी लावणार, असे विचारले असता या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले.

काही दिवसानंतर तर त्यांचे फोन बंद झाले. विशाल पिलावरे हा जाधव यांना एके दिवशी राजवाड्यावर भेटला. त्यावेळी त्याने माझा मित्र गायकवाड याने धोत्रे यांना तुमच्या मुलाच्या नोकरीसंदर्भात चर्चा केली होती, असे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माजी सैनिक विलास जाधव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसर