शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

मंत्री गोरे खंडणी प्रकरण: माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची सात तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:38 IST

अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर झाले होते पोलिस ठाण्यात हजर

वडूज : मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणीप्रकरणी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना वडूज पोलिसांनी समन्स बजावले होते. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर प्रभाकर देशमुख सोमवारी सकाळी वडूज पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी देशमुख यांची तब्बल सात तास चौकशी करून त्यांचा जबाब घेतला.मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात यापूर्वी पत्रकार तुषार खरात, महिला व शिंदेसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना अटक होऊन सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रभाकर देशमुख यांना समन्स बजावण्यात आला होता. तो मिळताच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.त्यानंतर देशमुख दोन दिवसांपूर्वी जबाब देण्यासाठी हजर झाले होते. मात्र, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सोनवणे उपलब्ध नसल्याने त्या दिवशी त्यांचा जबाब होऊ शकला नाही. सोमवारी (दि. २) सकाळी वडूज पोलिस ठाण्यात येऊन देशमुख यांनी जबाब नोंदविला.यावेळी देशमुख समर्थक शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी होती.यापूर्वी माजी आमदार प्रभाकर घार्गे, विधानपरिषेदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी जबाब नोंदविले आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे संशयित आरोपी यांच्याशी संभाषण अथवा आर्थिक देवाण-घेवाण, व्हाॅटसॲप मेसेज आणि एकत्रित बैठक होऊन काही चर्चा झाली आहे का ? या अनुषंगाने प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

तिघांच्या जामिनावर आज निर्णयमंत्री गोरे यांच्याकडे मागितलेल्या खंडणीप्रकरणी अटकेत असलेले अनिल सुभेदार यांचा नियमित जामीन मिळणेबाबत तर प्रभाकर घार्गे व अनिल देसाई यांचा अटकपूर्व अंतरिम जामीनसाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सातारा या ठिकाणी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJaykumar Goreजयकुमार गोरेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस