शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बिल मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी, पंचायत समितीमधील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:41 IST

खासगी कंत्राटदाराच्या कामगारावर गुन्हा

सातारा : केलेल्या कामाच्या ११ लाख २० हजारांच्या बिलावर गटविकास अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका खासगी कंत्राटदाराच्या कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शंकर अनिल मोकाशी (रा. कण्हेर, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश राजेंद्र जाधव यांच्या नावाची ४ लाख व ७ लाख २० हजारांची दोन बिले मंजुरीसाठी पंचायत समितीमध्ये आली होती. मात्र, या बिलावर गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या खोट्या सह्या असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पंचायत समितीने या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीनेही या बिलावरील सही गटविकास अधिकाऱ्यांची नसल्याचे सांगितले. त्यानंतर पंचायत समितीमधील वरिष्ठ लेखा सहायक सचिन कुंभार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी संशयित शंकर मोकाशी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. महिला पोलिस उपनिरीक्षक जैस्वाल या अधिक तपास करीत आहेत.

मंजुरीसाठी खटाटोपसंशयित शंकर मोकाशी हा एका कंत्राटदाराकडे काम करतो. त्यांची बिले घेऊन तो पंचायत समितीमध्ये नेहमी येत असतो. हे बिलसुद्धा तो अशाच प्रकारे घेऊन आला. मात्र, स्वत: गट विकास अधिकाऱ्यांची सही करून मंजुरीसाठी दिले. त्याचा हा बनाव अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही. लवकर बिल मंजूर व्हावे, यासाठी त्याने हा शॉर्टकट मारला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरpanchayat samitiपंचायत समितीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस