वनपाल संदीप जोशीला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:00 AM2020-06-20T10:00:43+5:302020-06-20T10:02:48+5:30

साग वाहतुकीसाठी ५७ हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या वनपाल संदीप जोशी (वय ४०, रा. पुणे) याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.

Forester Sandeep Joshi in police custody | वनपाल संदीप जोशीला पोलीस कोठडी

वनपाल संदीप जोशीला पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देवनपाल संदीप जोशीला पोलीस कोठडीसाग वाहतुकीसाठी लाच स्वीकारताना झाली होती अटक

सातारा : साग वाहतुकीसाठी ५७ हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या वनपाल संदीप जोशी (वय ४०, रा. पुणे) याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.

तक्रारदाराचा साग वाहतुकीचा व्यवसाय आहे. साग वाहतुकीच्या परवानगीसाठी जोशीने संबंधित तक्रारदाराकडून ५७ हजार ४०० रुपयांची लाच घेतली होती.

दरम्यान, शुक्रवारी जोशीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. तसेच सातारा पालिकेतील आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे याला न्यायालयाने लाचप्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Forester Sandeep Joshi in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.