शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Dhangar Reservation: पाटणमध्ये चक्का जाम!, कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर आंदोलनकर्त्यांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:11 IST

लोणंद शहरात कडकडीत बंद 

पाटण : धनगर एकजुटीचा विजय असो, यळकोट यळकोट जय मल्हारपेठ, एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्कांचं नाही कुणाच्या बापाचं, आरं कोण म्हणतंय देत न्हाय घेतल्याशिवाय राहत न्हाय, अशा घोषणा देत पाटण तालुका धनगर समाज बांधवांनी बाजाराच्या दिवशी सोमवारी कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर ठिय्या मांडत रास्ता रोको केला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पाटण पोलिसांनी स्वत: आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.दरम्यान, पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात धनगर समाज वास्तव्यास आहे. या समाजातील मुले आता कुठे शिक्षण घेऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांना इतर समाजाप्रमाणे आरक्षण, शिष्यवृत्ती बरोबर विविध योजना, सोयीसुविधांचा लाभ मिळाला पाहिजे. आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा अट्टाहास आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत यापुढेही आमचा रास्ता रोको असाच सुरू राहील, असा इशाराही धनगर समाजाच्या वतीने आंदोलनकर्ते लक्ष्मण झोरे यांनी दिला आहे.धनगर समाजाला आरक्षण बरोबरच इतर मागण्यांसाठी सोमवार, दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता झेंडा चौक पाटण येथे कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर पाटण तालुका धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको (चक्का जाम) आंदोलन करण्यात आले. वेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून घोषणाबाजी केली धनगर समाजाला गेली ७३ वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. केवळ एका अक्षरामुळे तो म्हणजे र आणि ड शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. शासनाने यात दुरुस्ती करावी. महाराष्ट्रातील गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या पाळणारे यांच्यावर सातत्याने होत असणारे अन्याय दूर करावे. राज्य सरकारने एक हजार कोटीची तरतूद केली आहे त्या तरतुदीची तातडीने अंमलबजावणी करावी.तसेच धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करूनच मेगा भरती करावी, अशी मागणी याप्रसंगी बोलताना जानू झोरे व इतर आंदोलनकर्त्यांनी बोलताना केली. बऱ्याच वेळानंतर पाटण पोलिसांनी स्वत:हून आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास पाडळे यांच्यासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.लोणंद शहरात कडकडीत बंद लोणंद : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या १२ दिवसांपासून गणेश केसकर हे लोणंद नगरपंचायतीसमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बारा दिवस होऊनही राज्य शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. यामुळे दि. २७ रोजी खंडाळा तालुका बंदची हाक खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने देण्यात आली होती. याला प्रतिसाद देत लोणंद शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून सायंकाळपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. खंडाळा व शिरवळ या ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDhangar Reservationधनगर आरक्षणpatan-acपाटण