शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचं ठरलं; माढ्याचं उरलं!; शरद पवार पेच कसा सोडविणार याकडे लक्ष 

By नितीन काळेल | Updated: April 10, 2024 19:11 IST

धैर्यशील यांच्या वाढदिवसानंतरच निर्णय!

सातारा : आघाडीतील राष्ट्रवादीने तिसऱ्या यादीत साताऱ्यातही उमेदवार दिला. पण, माढा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. इच्छुकांचे तळ्यात-मळ्यातच सुरू असल्याने गळालाही कोणी लागले नाही. त्यामुळेच पक्षाच्या शेवटच्या उमेदवाराबाबत निर्माण झालेला हा पेच शरद पवार कसा सोडविणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जाहीर होऊन १५ दिवस झाले. पण, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात उमेदवारीचा पेच कायम आहे. पक्षातील अभयसिंह जगताप हे पाय रोवून उभे आहेत. पण, पवार यांच्या मनात वेगळेच असल्याचे दिसत आहे. कारण, भाजपने खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीत उठाव झाला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे रामराजे नाईक - निंबाळकर यांनी रणजितसिंह यांना प्रचंड विरोध केला आहे. तसेच अकलुजचे मोहिते - पाटीलही नाराज आहेत. भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते यांनाही उमेदवारी हवी होती. पण, दुर्लक्ष झाल्याने ते वेगळ्या वाटेवर आहेत. यामुळेच फलटणचे राजे आणि मोहिते - पाटील यांची भूमिका ही खासदारांच्या विरोधात लढण्याची आहे.आतापर्यंत मोहिते - पाटील आणि फलटणच्या राजे गटात अनेक बैठका झाल्या. त्यामध्ये धैर्यशील मोहिते यांनीच तुतारी हाती घ्यावी, असे निश्चित झाल्याची माहिती आहे. धैर्यशील यांनीही शरद पवार यांची आठ दिवसांपूर्वी भेट घेऊन चर्चा केली. पण, या चर्चेचे फलित दिसलेले नाही. अजूनही धैर्यशील भाजपमध्येच दिसतात. तरीही त्यांच्या मतदारसंघातील भेटी सुरूच आहेत. त्यामुळे धैर्यशील यांचा निवडणुकीचा इरादा पक्का दिसत असला तरी राष्ट्रवादीत जाण्याची हालचाली अजूनही संथच जाणवत आहे. त्यामुळे शरद पवार यांनाही निर्णय घेणे अवघड झालेले आहे.

राज्यातील जागावाटपात महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे १० मतदारसंघ आले आहेत. आतापर्यंत ९ मतदारसंघांचे उमेदवार जाहीर झाले. पण, माढ्याचा तिढा कायम आहे. यातच पवार गटाकडून निवडणूक लढविणाऱ्यांची भूमिका तळ्यात - मळ्यात दिसत आहे. त्यामुळे पवार यांचा गळ कधी लागणार आणि उमेदवारीचा तिढा कधी सुटणार, याकडे लक्ष लागले आहे.

धैर्यशील यांच्या वाढदिवसानंतरच निर्णय!रामराजे नाईक - निंबाळकर यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यामुळे भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी भेट घेतली. तसेच धैर्यशील माेहितेही फलटणला आले. धैर्यशील यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. यावरूनच धैर्यशील तुतारी हाती घेतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर १३ एप्रिलला धैर्यशील मोहिते यांचा वाढदिवस आहे. यावेळीच ते आपली भूमिका जाहीर करतील आणि शरद पवार गटातून १६ एप्रिलला अर्ज भरतील, अशी चर्चा सुरू आहे. पण, भाजपच्या वरिष्ठांनी यात लक्ष घातल्यास धैर्यशील यांची भूमिका काय राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४madha-pcमाढाSharad Pawarशरद पवार