फुलझाडांना बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST2021-01-03T04:36:53+5:302021-01-03T04:36:53+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड शहरात पालिका प्रशासनाच्यावतीने सौंदर्याच्यादृष्टीने आयलॅन्डमध्ये विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आलेली होती. त्याची सध्या काळजी घेतली जात ...

Flowers bloom | फुलझाडांना बहर

फुलझाडांना बहर

कऱ्हाड : कऱ्हाड शहरात पालिका प्रशासनाच्यावतीने सौंदर्याच्यादृष्टीने आयलॅन्डमध्ये विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आलेली होती. त्याची सध्या काळजी घेतली जात आहे. दिवसात एकदा त्यांना पालिकेकडून पाणी दिले जात असल्याने या फुलझाडांना चांगलाच बहर आला असून ही फुलझाडे शहराची शोभा वाढवित आहेत.

झाडांचा धोका

कऱ्हाड : सुपने-किरपे दरम्यानच्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडूपे वाढली आहेत. वाढलेल्या झाडांमुळे वळणावर समोरून आलेले वाहन दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता चांगला असल्याने या रस्त्यावरून वाहने सुसाट जात असतात. त्यातच पुढचे वाहन न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्लास्टिकचा वापर

कऱ्हाड : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची मोहीम थंडावली असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काही व्यापारी, दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत.

मास्ककडे दुर्लक्ष (फोटो : ०२इन्फोबॉक्स०१)

कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू असल्यामुळे तसेच सध्या विवाह समारंभासह सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. मात्र, अशात कोरोनाच्या नियमांना तिलांजली दिली जात असून अनेकजण विनामास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे.

Web Title: Flowers bloom