थकबाकी असणारांची नावे फ्लेक्सवर!
By Admin | Updated: March 25, 2017 16:59 IST2017-03-25T16:59:15+5:302017-03-25T16:59:15+5:30
तारळेत कार्यवाही : कर वसुलीसाठी ग्रामपंचायत आक्रमक

थकबाकी असणारांची नावे फ्लेक्सवर!
आॅनलाईन लोकमत
तारळे , दि. २५ : पंचायत समिती व येथील ग्रामपंचायतीने थकित कर वसुलीसाठी कंबर कसली आहे. कर वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी विविध पयार्याबरोबर मोठ्या थकबाकीदारांची नावे चौकाचौकात फ्लेक्सवर झळकणार आहेत.
खातेदारांकडून जमा होणाऱ्या रकमेतूनच ग्रामपंचायतीतर्फे लोकांना आरोग्य, पाणी, वीज, स्वच्छता व इतर सोयीसुविधा पुरविण्यात येतात. त्यासाठी वेळोवेळी जनजागृती करण्याबरोबरच घरोघरी जाऊन कर मागणी केली जात आहे. तरीही अनेक खातेदार कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे प्राथमिक सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीवर मर्यादा येत आहेत.
ग्रामपंचायत व पंचायत समितीने करवसुलीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून नळ कनेक्शन बंद करणे, मालमत्ता जप्त करणे आदी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वषार्नुवर्ष ग्रामपंचायतीचा कर थकविणाऱ्या मोठ्या खातेदारांची यादी चौकात फ्लेक्सवर लावली जाणार आहे. त्यामुळे खातेदारांचे धाबे दणाणले आहेत.