शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शेखर गोरेंसह पाचजणांवर अपहरणाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 13:57 IST

Crime News satara- पानवण, ता. माण येथील डॉक्टर नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना याच गावातील सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांचेही अपहरण झाल्याचे समोर आले आहे. धनाजी शिंदे यांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे अपहरण झालेले डॉक्टर परतलेपण आणखी एकाचे अपहरण झाल्याची तक्रार

म्हसवड ; पानवण, ता. माण येथील डॉक्टर नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना याच गावातील सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांचेही अपहरण झाल्याचे समोर आले आहे. धनाजी शिंदे यांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शेखर गोरे, राजेंद्र उर्फ राजू जाधव, संग्राम अनिलकुमार शेटे, राहुल अर्जून गोरे, विरकुमार पोपटलाल गांधी, चालक हरिदास गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.जिल्हा बँकेच्या ठरावावरून डॉ. नानासाहेब शिंदे यांचे शनिवारी रात्री साठेआठ वाजता अज्ञाताने अपहरण केले होते. यावेळी अपहरणकर्त्यांनी त्यांची कार अ‍ॅसीडने जाळण्याचाही प्रयत्न केला होता.

या प्रकारानंतर डॉक्टरांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली. त्यानंतर डॉक्टर स्वत:हून रविवारी सायंकाळी अचानक घरी परले. त्यामुळे त्यांचे नेमके कोणी अपहरण केले, याची चौकशी सध्या पोलीस त्यांच्याकडे करत आहेत. हे प्रकरण सुरू असतानाच पानवच्या सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांनीही आपले अपहरण झाल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.धनाजी शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेखर गोरेंसह पाचजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. धनाजी शिंदे यांनी दिलेल्या तक्रीत म्हटले आहे की, वरील संशयितांनी कारमध्ये जबरदस्तीने बसवून कुळजाइमधील फार्महाऊसवर तसेच ठाण्यातील लॉजवर थांबवून ठेवले.

दरम्यान, डॉ. नानासाहेब शिंदे आणि धनाजी शिंदे यांच्या अपहरणाच्या प्रकारणाला कलाटणी मिळाली असून, पोलीस संबंधितांकडे कसून चौकशी करत आहेत. सायंकाळपर्यंत यातील वस्तूसिैथती समोर येणार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर