शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेखर गोरेंसह पाचजणांवर अपहरणाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 20:48 IST

Crime News Satarapolice- पानवण, ता. माण येथील डॉक्टर नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना, याच गावातील सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांचेही अपहरण झाल्याचे समोर आले आहे. धनाजी शिंदे यांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देअपहरण झालेले डॉक्टर परतलेआणखी एकाचे अपहरण झाल्याची तक्रार

म्हसवड : पानवण, ता. माण येथील डॉक्टर नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना, याच गावातील सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांचेही अपहरण झाल्याचे समोर आले आहे. धनाजी शिंदे यांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शेखर गोरे, राजेंद्र ऊर्फ राजू जाधव, संग्राम अनिलकुमार शेटे, राहुल अर्जुन गोरे, वीरकुमार पोपटलाल गांधी, चालक हरिदास गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.जिल्हा बँकेच्या ठरावावरून डॉ. नानासाहेब शिंदे यांचे शनिवारी रात्री साडेआठ वाजता अज्ञाताने अपहरण केले होते. यावेळी अपहरणकर्त्यांनी त्यांची कार अ‍ॅसिडने जाळण्याचाही प्रयत्न केला होता.

या प्रकारानंतर डॉक्टरांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली. त्यानंतर डॉक्टर स्वत:हून रविवारी सायंकाळी अचानक घरी परतले. त्यामुळे त्यांचे नेमके कोणी अपहरण केले, याची चौकशी सध्या पोलीस त्यांच्याकडे करत आहेत.

हे प्रकरण सुरू असतानाच पानवच्या सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांनीही आपले अपहरण झाल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.धनाजी शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेखर गोरेंसह पाचजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. धनाजी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वरील संशयितांनी कारमध्ये जबरदस्तीने बसवून कुळजाईमधील फार्म हाऊसवर तसेच ठाण्यातील लॉजवर थांबवून ठेवले.

दरम्यान, डॉ. नानासाहेब शिंदे आणि धनाजी शिंदे यांच्या अपहरणाच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून, पोलीस संबंधितांकडे कसून चौकशी करत आहेत. सायंकाळपर्यंत यातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdocterडॉक्टरPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर