शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’चे पाच रुग्ण, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:03 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन रुग्ण हे १५ वर्षांखालील आहेत तर ...

सातारा : सातारा जिल्ह्यात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन रुग्ण हे १५ वर्षांखालील आहेत तर दोन रुग्ण ६५ वर्षांच्यावरील आहेत. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे यांनी स्पष्ट केले.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या पाचपैकी एका रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर अन्य चार रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयांना संपर्क साधून अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यास जवळच्या आरोग्य संस्थेची संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वेक्षण करण्यात येत असून, सतर्क राहून नवीन रुग्ण निदान होणाऱ्या भागात त्वरित सर्वेक्षण करण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या संशयित रुग्णाचे रक्त, लघवी वा शाैच नमुने एनआयव्ही पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

‘जीबीएस’चा आजार हा दूषित अन्न किंवा पाणी या माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. हा आजार अचानक उद्भवतो आणि चार आठवड्यांपर्यंत वाढतो. त्यामुळे नागरिकांनी उपचारास विलंब टाळावा. -डाॅ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य