पाचवडमध्ये परप्रांतीय युवकाचा खून, संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 11:04 IST2019-12-17T11:03:57+5:302019-12-17T11:04:05+5:30

पाचवड  येथील नव्याने सुरू झालेल्या टाईल्स व फरशी दुकानामध्ये कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडे बारा वाजता ही घटना घडली.

Five killed in custody of suspected youth in custody | पाचवडमध्ये परप्रांतीय युवकाचा खून, संशयित ताब्यात

पाचवडमध्ये परप्रांतीय युवकाचा खून, संशयित ताब्यात

पाचवड :  पाचवड  येथील नव्याने सुरू झालेल्या टाईल्स व फरशी दुकानामध्ये कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडे बारा वाजता ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पाचवड येथे नव्याने सुरू झालेल्या टाईल्स व फरशी विक्री दुकानामध्ये पश्चिम बंगाल येथील रंजन मुजुमदार आणि शुभम देवणाल  हे कामगार काम करीत होते.

सोमवार 16 रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास या दोघामध्ये भांडण झाले. यावेळी शुभम याने रंजन मुजुमदार (वय ५५ )  याच्या डोक्यात तेथे असणारे कमोड घातले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि. शाम बुवा यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन शुभल देवनाल याला ताब्यात घेतले. भांडणाचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Five killed in custody of suspected youth in custody