कऱ्हाड तालुक्यातील दिव्यांगांना पाच टक्के राखीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST2021-04-20T04:40:58+5:302021-04-20T04:40:58+5:30

मसूर : कऱ्हाड तालुक्यातील दिव्यांगाना जिल्हा परिषदेकडून पाच टक्के राखीव निधीमधून भरघोस निधी उपलब्ध झाल्याची माहिती राष्ट्रीय अपंग ...

Five per cent reserve fund for the disabled in Karhad taluka | कऱ्हाड तालुक्यातील दिव्यांगांना पाच टक्के राखीव निधी

कऱ्हाड तालुक्यातील दिव्यांगांना पाच टक्के राखीव निधी

मसूर : कऱ्हाड तालुक्यातील दिव्यांगाना जिल्हा परिषदेकडून पाच टक्के राखीव निधीमधून भरघोस निधी उपलब्ध झाल्याची माहिती राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष ॲड. रणजितसिंह जगदाळे यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिता धनवडे व कार्याध्यक्ष नंदकुमार धनवडे उपस्थित होते.

यावेळी ॲड. रणजितसिंह जगदाळे म्हणाले, ‘कऱ्हाड तालुक्यातील दिव्यांगांना वस्तू स्वरूपात भरघोस निधी देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या पाच टक्के राखीव निधीतून दिव्यांगांना ९ घरकुले, ३६ घरघंट्या, २७ झेरॉक्स मशीन, ८ चारचाकी स्कूटर, ८ लॅपटॉप, दिव्यांग विवाह योजना सवलत, तीन दुचाकीसह ऊस रसाची यंत्रे, ५ पिको फॉल मशीन व उदरनिर्वाह भत्ता असा सुमारे १५ लाखांचा निधी प्रथमच कऱ्हाड तालुक्याला मिळाला आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत बाळासाहेब पाटील यांनी लॉटरी पद्धतीने निघालेल्या लॉटरीमधून दिव्यांगाना लाभ दिला.

Web Title: Five per cent reserve fund for the disabled in Karhad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.