‘स्वच्छता दर्पण’मध्ये सातारा देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:19 IST2017-09-26T23:19:08+5:302017-09-26T23:19:08+5:30

First in 'Saturna mirror' in Satara country | ‘स्वच्छता दर्पण’मध्ये सातारा देशात प्रथम

‘स्वच्छता दर्पण’मध्ये सातारा देशात प्रथम



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा जिल्ह्याचे उल्लेखनीय काम झाले असून, स्वच्छतेवर आधारित दिलेल्या गुणांकनानुसार हे पाच जिल्हे देशात प्रथम स्थानावर आले आहेत. येत्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या पाच जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने २ आॅक्टोबर रोजी केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत होणाºया कामांवर आधारित याचे गुणांकन केले असून, यामध्ये हे पाच जिल्हे देशात प्रथम स्थानावर आहेत.
स्वच्छतेवर आधारित दिलेल्या गुणांकनानुसार या पाच जिल्ह्यांना ९० गुण मिळाले आहेत. दि. २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाºयांनी मेहनत घेतली. या कामगिरीसाठी कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई व या विभागातील तज्ज्ञ व सल्लागार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले गुण
कोल्हापूर जिल्ह्याला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत. तसेच शाश्वतता या घटकासाठी २५ पैकी १५ गुण मिळाले आहेत; तसेच पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.
महाराष्टÑातील
पाच जिल्हे
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा

Web Title: First in 'Saturna mirror' in Satara country