पश्चिम महाराष्ट्रातील पहिला चारा डेपो वडगाव येथे सुरू

By Admin | Updated: May 30, 2016 00:45 IST2016-05-29T22:08:28+5:302016-05-30T00:45:10+5:30

मुंबईच्या जैन संघाची सामाजिक बांधिलकी

First phase depot in Western Maharashtra starts at depot, Wadgaon | पश्चिम महाराष्ट्रातील पहिला चारा डेपो वडगाव येथे सुरू

पश्चिम महाराष्ट्रातील पहिला चारा डेपो वडगाव येथे सुरू

सातारा : श्री वर्धमान परिवार संचालित व जैन संघ मुंबई यांच्या वतीने तसेच जय भगवान प्रतिष्ठान (सातारा) यांच्या सहकार्याने माण तालुक्यातील वडगाव येथे जनावरांकरिता पश्चिम महाराष्ट्रातील पहिला मोफत चारा डेपो सुरू करण्यात आला. या चारा डेपोच्े उद्घाटन देवांगभाई शहा, हेमंतजी हिरण, समरथमलजी जैन आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
महाराष्ट्रात गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळापेक्षाही यंदाचा दुष्काळ अधिक तीव्र आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जैन संघ मुंबई यांच्या वतीने तसेच जय भगवान प्रतिष्ठान (सातारा) यांच्या सहकार्याने वडगाव येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला चारा डेपो सुरू करण्यात आला.
या अंतर्गत पाऊस सुरू होईपर्यंत वडगावसह परिसरातील १ हजार ७७७ जनावरांना प्रतिदहा किलो चाऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे. चारा डेपो सुरू केल्याबद्दल भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस धनंजय ओंबासे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी डॉ. प्रसाद ओंबासे, नितीन ओंबासे, छगन ओंबासे, सीताराम दडस, आत्माराम कोकरे, मुणेर शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: First phase depot in Western Maharashtra starts at depot, Wadgaon