घरकुलच्या २५ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता! साताऱ्यात शनिवारी कार्यक्रम

By नितीन काळेल | Updated: February 21, 2025 20:36 IST2025-02-21T20:35:18+5:302025-02-21T20:36:24+5:30

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सातारा जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक घरकुले मंजूर झालेली आहेत.

First installment to 25 thousand beneficiaries of Gharkul Program in Satara on Saturday | घरकुलच्या २५ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता! साताऱ्यात शनिवारी कार्यक्रम

घरकुलच्या २५ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता! साताऱ्यात शनिवारी कार्यक्रम


सातारा : पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सातारा जिल्ह्यात प्रतीक्षा यादीतील ३६ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामधील २५ हजार लाभार्थ्यांना शनिवारी घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेतही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील १ हजार ४९२ ग्रामपंचायतींमध्येही विशेष ग्रामसभा होत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सातारा जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक घरकुले मंजूर झालेली आहेत. यामधील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला १५ हजार रुपयांचा हप्ताही वर्ग केला जाणार आहे. यासाठी शनिवार, दि. २२ रोजी कार्यक्रम होणार आहे.

राज्यस्तरावरील कार्यक्रम पुणे येथे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या प्रमुख उपस्थितीत या अभियान अंतर्गत २० लाख घरकुलांना मंजुरी तर १० लाख लाभार्थींना घरकुलाचा पहिला हप्ता वितरण होत आहे. सातारा येथे जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी चार वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सीद उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात १० घरकूल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात येणार आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यात एकाचवेळी हजारो घरकुलांना मंजुरी आणि पहिला हप्ता मिळणार आहे.
 

 

Web Title: First installment to 25 thousand beneficiaries of Gharkul Program in Satara on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.