पंचायतीसाठीचा पहिला दिवस मोकळाच

By Admin | Updated: March 17, 2016 23:35 IST2016-03-17T22:07:58+5:302016-03-17T23:35:11+5:30

लोणंद निवडणूक : ४१ अर्जांची विक्री; अनेकांचे लक्ष मुहूर्ताकडे, दि. १७ एप्रिल रोजी मतदान --लोणंदचं रणकंदन

The first day for the Panchayat will be open | पंचायतीसाठीचा पहिला दिवस मोकळाच

पंचायतीसाठीचा पहिला दिवस मोकळाच

लोणंद : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या व प्रथमच निवडणूक होत असणाऱ्या लोणंद नगरपंचायतीसाठी पहिल्या दिवशी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र, तब्बल ४१ अर्जांची विक्री झाली आहे. अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्त शोधला आहे. दरम्यान, नगरपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार, हे स्पष्ट आहे. लोणंद नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. प्रथमच ही निवडणूक होत आहे. दि. २२ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. दि. ४ एप्रिलला माघार घ्यायची मुदत असून, दि. १७ एप्रिलला मतदान तर दुसऱ्या दिवशी दि. १८ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून लोणंदमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. त्यातच आता उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्याने सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा रंगू लागली आहे.  लोणंद नगरपंचायतीसाठी दि. २२ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. १७ प्रभागासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवार हा अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता. १७ तारीख असल्याने व ती खतऱ्याची घंटा ठरू नये, यासाठी इच्छुकांनी एकही अर्ज दाखल केला नाही; मात्र दिवसभरात ४१ उमेदवारी अर्जांची विक्री झाली, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारी विविध कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. कागदपत्रे जुळविण्यासाठी अनेकांची धावपळ होताना दिसून येत आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीनेही जय्यत तयारी करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या कार्यालयातच उमेदवारी अर्ज विक्री, वसुली विभाग, उमेदवारी अर्जासंदर्भातील सर्व कागदपत्रे विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. दरम्यान, येथील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, दि. २२ रोजीच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह अपक्षांनीही कंबर कसली आहे. (वार्ताहर)


कर वसुली जोरात...-नगरपंचायतीची निवडणूक आहे. अनेक इच्छुक अर्ज भरण्यासाठी तयार झाले आहेत. निवडणूक लढविताना थकबाकी नसल्याचे दाखले द्यावे लागतात. सध्या अनेक इच्छुक थकबाकी भरून दाखले घेत आहेत. त्यामुळे कर वसुली जोरात असल्याचे दिसत आहे.

अर्ज भरण्याचा दिवस व वेळ... -अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्योतिषाचा सल्ला घेतला आहे. अर्ज भरण्याचा दिवस व वेळ ठरविण्यात आली आहे. ज्योतिषांकडून सोमवार व मंगळवार असे दोन दिवस सकाळी ९ ते दुपारी एकपर्यंत वेळ चांगली असल्याचे सांगितली गेली आहे. त्यामुळे संबंधित दोन दिवशी अधिक अर्ज दाखल होतील, असे सांगण्यात येत आहे.

Web Title: The first day for the Panchayat will be open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.