शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

साताऱ्यातील अजिंक्यताऱ्यावर पहिली दुर्ग परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:51 AM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गडकोटांच्या तटबंदीसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, वृक्ष लागवड करताना घ्यावयाची काळजी अन् दुर्ग संस्थांना नोंदणीसह निधी संकलन करताना येणाऱ्या अडचणी यासह विविध विषयांवर राजधानी सातारा येथे झालेल्या पहिल्या दुर्ग परिषदेत व्यापक विचारमंथन झाले. त्याचबरोबर गडकोट संवर्धनासाठी एकमेकांच्या हातात हात घालून जिल्ह्यातील गडकोटांची शोभा वाढवण्याचा निर्धार करत संवर्धनासाठी झटणाऱ्या संस्थांची एक समितीही स्थापन करण्यात आली.

ठळक मुद्देगडकोटांची शोभा वाढविण्याचा निर्धारजिल्ह्यातील २२ संस्था एकवटल्या

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गडकोटांच्या तटबंदीसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, वृक्ष लागवड करताना घ्यावयाची काळजी अन् दुर्ग संस्थांना नोंदणीसह निधी संकलन करताना येणाऱ्या अडचणी यासह विविध विषयांवर राजधानी सातारा येथे झालेल्या पहिल्या दुर्ग परिषदेत व्यापक विचारमंथन झाले.त्याचबरोबर गडकोट संवर्धनासाठी एकमेकांच्या हातात हात घालून जिल्ह्यातील गडकोटांची शोभा वाढवण्याचा निर्धार करत संवर्धनासाठी झटणाऱ्या संस्थांची एक समितीही स्थापन करण्यात आली.सातारा जिल्ह्यातील २२ विविध दुर्ग संस्थांनी एकत्रित येत किल्ले अजिंक्यतारा येथे बुधवारी पहिली दुर्ग परिषद आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या परिषदेस प्रारंभ झाल्यानंतर सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर गडकोटांवरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना घ्यावयाची काळजी, गडावर तसेच तटबंदी परिसरात वृक्ष लागवड आणि संगोपन करताना घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सोशल मीडियासह विविध समाज माध्यमांचा वापर करून गडकोट संवर्धनासाठी व्यापक प्रमाणावर महाविद्यालयीन युवक - युवती यांच्यामध्ये जनजागृती करणे, गडसंवर्धन चळवळ शाळा, महाविद्यालयापर्यंत नेण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याबाबतही पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले. ऐतिहासिक वास्तूंना वृक्षामुळे धोका निर्माण झाल्यास कोणती उपाययोजना करावी, याबाबत दुर्ग संस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.किल्ले सुभानमंगल, चंदनवंदन, कमळगड, पांडवगड यासह काही किल्ल्याकडे राज्य शासनासह केंद्र सरकारचे झालेले दुर्लक्ष आणि यामुळे किल्ल्याच्या अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्यावर चर्चा करण्यात आली. तसेच याप्रश्नी जिल्हाधिकारी तसेच शासनाकडे दाद मागण्यासह प्रसंगी लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धारही यावेळी एकमताने करण्यात आला. जलसंधारण आणि सीएसआर फंडातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याबाबतही विचारविनिमय व मार्गदर्शन करण्यात आले. किल्ले अजिंक्यतारा येथे श्रमदान करून पहिल्या दुर्ग परिषदेची सांगता झाली.

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसर