‘लोकसंख्या शिक्षण’ विषयावरील उपकरण प्रथम
By Admin | Updated: December 17, 2014 23:02 IST2014-12-17T21:33:15+5:302014-12-17T23:02:04+5:30
लोकसंख्येची वाढ, त्याची कारणे, त्याच्यावरील उपाय, लोकसंख्येला आळा घातल्यास होणारे फायदे

‘लोकसंख्या शिक्षण’ विषयावरील उपकरण प्रथम
कऱ्हाड : जिल्हा परिषद व कऱ्हाड पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने शिवनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षिका नकुशी देवकर यांनी सादर केलेल्या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. ‘लोकसंख्या शिक्षण’ हा विषय गृहित धरून देवकर यांनी संबंधित उपकरण तयार केले होते. लोकसंख्या शिक्षण या विषयांतर्गत लोकसंख्या शिक्षण, लोकसंख्येची वाढ, त्याची कारणे, त्याच्यावरील उपाय, लोकसंख्येला आळा घातल्यास होणारे फायदे या घटकांना अनुसरून वाघेश्वर शाळेच्या शिक्षिका नकुशी देवकर यांनी सापशिडी तयार केली होती. या सापशिडीद्वारे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रबोधनाचा प्रयत्न केला होता. प्रदर्शनस्थळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, रवींद्र खंदारे, शिक्षणविस्तार अधिकारी नितीन जगताप यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने मानसिंगराव जगदाळे, विस्तार अधिकारी जंगम, केंद्रप्रमुख शकुंतला साळुंखे, मुख्याध्यापक यशवंत खाडे यांच्या उपस्थितीत देवकर यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)