वाई एमआयडीसीत पूर्व वैमस्यातून गोळीबार

By दीपक शिंदे | Published: June 24, 2024 11:53 PM2024-06-24T23:53:51+5:302024-06-24T23:54:05+5:30

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सह पोलीस दाखल झाले आहेत.

firing from past hostility in wai midc | वाई एमआयडीसीत पूर्व वैमस्यातून गोळीबार

वाई एमआयडीसीत पूर्व वैमस्यातून गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्क, वाई : वाईच्या एमआयडीसीत  पूर्व वैमनस्यातून  गोळीबार झाला असून गोळीबारात एकजण जखमी झाला आहे.  

सोमवारी दि. २४ रोजी रात्री आठ वाजता अक्षय निकम याने जून्या भांडणाचा राग मनात धरून अमन सय्यद  (वय २६ वर्षे) रा. बोपर्डी याच्यावर एमआयडीसीतील चांदणी चौकात पानपट्टी जवळ बसलेला असताना आपल्या मित्रासमवेत दुचाकीवरून येऊन गोळीबार केला. सुदैवाने गोळी हाताला चाटून गेली. गोळीबारात अमन सय्यद हा जखमी झाला असून त्याला वाई ग्रामीण रुण्गालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सह पोलीस दाखल झाले आहेत.

Web Title: firing from past hostility in wai midc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.