शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आगाशिवनगर घनकचरा प्रकल्पात अग्नितांडव, कोट्यवधीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 12:01 IST

बेल्ट कन्वेअर, बेलींग मशीन, सोलर पॕनलसह शेड जळून खाक

माणिक डोंगरेमलकापूर : आगाशिवनगरात घनकचरा प्रकल्पाला लागलेल्या आगीत बेल्ट कन्वेअर, बेलींग मशीन, सोलर पॕनलसह शेड व रॉमटेरिअल जळून खाक झाले. या आगीत कोठ्यावधी रूपयाचे नुकसान झाले आहे. आगाशिवनगर येथील माळीनगर नजीक बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीच्या वेळी कोणीही नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. कराड पालिका, कृष्णा हॉस्पिटल अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्याने सुमारे पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आगाशिवनगर येथील घनकचरा प्रकल्पात आग लागल्याचे आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. बघता बघता आगीचे लोळ बाहेर पडू लागले.आगीची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक व पालिकेचे अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत काही नागरिकांनी आगीची माहिती कराड नगरपालिका, कृष्णा हॉस्पिटल अग्निशामक दल यंत्रणेला दिली. माहिती मिळताच कृष्णा रुग्णालय व त्यानंतर काही वेळातच कराड नगरपालिकेचे अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. चहुबाजूनी पाण्याचा मारा सुरू झाल्याने सुमारे पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग  आटोक्यात आली. तोपर्यंत प्रकल्पातील बेल्ट कन्वेअर, बेलींग मशीन, सोलर पॕनल, शेड, वायरींगसह रॉमटेरिअल जळून खाक झाल्याने कोठ्यावधी रूपयाचे नुकसान झाले आहे.

मलकापूर पालिकेचे तातडीने पाणी

येथील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय जवळच असल्यामुळे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत आलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्यांना तातडीने पाणीपुरवठा केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग