शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

जाती-धर्मापलीकडे विद्वत्ता शोधा : श्रीपाल सबनीस-- जिल्हा ग्रंथमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:00 IST

‘गरिबीत वाढणारी , खेड्यापाड्यातील विद्वान पिढी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन शोधण्याची गरज आहे. असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देउदयनराजे अन् मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनजिल्हा परिषद मैदानावर साहित्यप्रेमींची हजेरी

सातारा : ‘गरिबीत वाढणारी , खेड्यापाड्यातील विद्वान पिढी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन शोधण्याची गरज आहे. असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

येथील जिल्हा परिषद मैदानावरील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे नगरीत सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २० व्या सातारा जिल्हा गं्रथमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर खासदार उदयनराजे भोसले, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, वि. ना. लांडगे, शेखर हसबनीस, प्रदीप कांबळे, साहेबराव होळ, डॉ. राजेंद्र माने, आर. पी. निकम, प्रकाशक सुनीताराजे पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.श्रीपाल सबनीस म्हणाले, ग्रंथमहोत्सवात शंभर स्टॉल्स लागतात, राज्यातून पुस्तक विक्रीसाठी लोक येतात, चार दिवस साताऱ्याच्या नगरीत हा ज्ञानाचा उत्सव भरतो. इथं लेखक-वाचक घडतो, समीक्षक जन्माला येतो. बहुआयामी, बहुसांस्कृतिकता, बहुकलात्मकता जोपासणारा आणि पचवणारा आदर्श रसिकही जन्माला येतो. साताºयाच्या संस्कृतीचं हे वैभव आहे,’

ते पुढे म्हणाले, ‘एकीकडे ऐतिहासिक मानदंड दुसरीकडे सांस्कृतिक मानदंड आहेत. अशा दोन मानदंडांची बेरीज संस्कृतीच्या पातळीवर वर्तमान महाराष्ट्राच्या नकाशावर सातारा जिल्ह्याच्या गौरवात ग्रंथमहोत्सवाने भर टाकली. यातील आयोजकांचे परस्परांशी असलेला संवाद आणि सख्य सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. इतकं सख्य अभावानेच पाहायला मिळते. साहित्य वा ग्रंथाची कोणतीही संस्था चालविताना प्रचंड भानगडी महाराष्ट्रात अनुभवत असताना साताºयात दोन कार्यवाह एकाच पदावरची दोन माणसं गुण्यागोविंदाने काम करतायत, याचा आनंद होतोय. त्यामुळेच संस्कृतीची पालखी वाहताना निष्ठा आणि प्रगल्भता महत्त्वाची.

माणसातील जनावरपण जर शिल्लक राहिला असेल तर हे पशुत्व अडीच हजार वर्षांच्या सांस्कृतिक विकासाच्या अजेंड्यावर अजूनही कायम दिसते. या जनावरांचं प्रश्नचिन्ह कसं मिटवायचं, कसं संपवायचं? हा खºया धर्मासमोरचा प्रश्न आहे. खोटे धर्म, खोटा धार्मिक आणि सत्ताकारणाचा संबंध स्वार्थासाठी बेरीज करणारी दुकानदारी इथं राजकारणात आहे. असंच कुरूप वास्तव महाराष्ट्र आणि देशाच्या माथी बसले असेल तर मग या अध:पतनातून महाराष्ट्राला आणि देशाला कोण वाचवणार? या प्रश्नाचं उत्तर साताºयाच्या ग्रंथमहोत्सवानं गेल्या वीस वर्षांपासून दिलं आहे. ग्रंथ माणसाला वाचवतील, ग्रंथ माणसाला सुधरवतील, ग्रंथ माणसाला विकसित करतील, ग्रंथ ज्ञानवंत बनवतील, पशुत्वापासून माणसाची मुक्तता करतील,दु:ख मुक्त मानवता, दु:ख मुक्त संस्कृती हा ग्रंथांचा देयवाद आहे. अत्यंत समृद्धपणे ग्रंथ आपलं दान वाचकांच्या पदरी टाकण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.’खासदार उदयनराजे म्हणाले, ‘वाचनामुळे व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता निर्माण होते. तुम्ही काय वाचताय, यावर तुम्ही काय घडणार, हे ठरतं. त्यामुळे विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून त्यातून स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करावा. मराठी भाषेतील समृद्ध ग्रंथसंपदा पुढे अनेक पिढ्यांना समृद्ध करण्यासाठी सज्ज आहे.’

यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, शिरीष चिटणीस, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वी. ना. लांडगे यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दीपक प्रभावळकर यांनी लिहिलेल्या राजकारणाची सातारा बखर या पुस्तकांसह रामकृष्ण जाधव, शीला जाधव व दिव्या राजमाने यांच्या पुस्तक आणि काव्यसंग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षकांसाठी ग्रंथमहोत्सव लाईव्ह!जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेला सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी यंदा विशेष सोय करण्यात आली आहे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या कल्पनेतून आणि ईझी टेस्ट या अ‍ॅपच्या माध्यमातून यंदाचा महोत्सव चार दिवस लाईव्ह करण्यात येणार आहे. मान्यवर वक्त्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबरच येथे होणारी चर्चासत्रे, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन शिक्षकांपर्यंत या अ‍ॅपच्या माध्यमातून पोहोचणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक शिक्षक इच्छा असूनही ग्रंथमहोत्सवाला येऊ शकत नाहीत. शिक्षकांची ही खंत लक्षात घेऊन पहिल्यांदाच शिक्षण विभागाने ही सोय केली आहे. शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना रोजच्या रोज शाळा सुटल्यानंतर आणि प्रवासादरम्यान मोबाईलद्वारे ग्रंथमहोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.