व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक विवंचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:12+5:302021-06-23T04:25:12+5:30
पाचगणी : मार्च महिन्यापासून पर्यटनस्थळे बंद आहेत. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने पर्यटनासाठी गिरिस्थान पाचगणी-महाबळेश्वर येथील विविध पाॅइंट ...

व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक विवंचना
पाचगणी : मार्च महिन्यापासून पर्यटनस्थळे बंद आहेत. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने पर्यटनासाठी गिरिस्थान पाचगणी-महाबळेश्वर येथील विविध पाॅइंट सुरू करावेत. त्या माध्यमातून उदनिर्वाहासाठी प्रश्न काही अंशी सुटेल. याकरिता पर्यटन पॉईंट सुरू होणे गरजेचे आहे,’ अशी मागणी येथील व्यावसायिक करीत आहेत.
लाॅकडाऊनमुळे उद्ध्वस्त झालेल्या पाचगणी-महाबळेश्वर येथील विविध पाॅईंटवरील पर्यटन व्यवसायावर स्थानिक व्यावसायिकांचा कटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. एक वर्षापासून कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसाय बंद आहेत. पहिली लाट ओसरताच कुठे थोडाफार पर्यटन व्यवसाय सुरू झाला होता. त्यास पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ब्रेक लागला. ऐन हंगाम वाया गेला आहे. आता तरी आर्थिक घडी विस्कटलेल्या स्थानिकांना पर्यटन व्यवसाय हाच मुख्य आर्थिक स्रोत आहे. सध्या तोच बंद असल्याने त्याचे जगणे अवघड झाले आहे. शासनाने कोरोना नियमांचे पालन करीत अटी शर्थीच्या अधीन राहून स्थानिक पर्यटन पॉईंट पर्यटकांकरिता खुले केल्यास स्थानिकांना थोडाफार रोजगार मिळेल याकरिता या दोन्ही गिरीस्थानांवरील पर्यटन पॉईंट सुरू करण्याची मागणी व्यावसायिक करीत आहेत.
चौकट :
महाबळेश्वर-पाचगणी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले, परंतु या दोन्ही गिरिस्थानावरील पाॅईंट बंद करण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळे सुरू केली मग स्थानिक नगरपरिषदेने पर्यटन पॉईंट बंद करून काय मिळवलं, असा प्रश्न विचारला जात आहे.