अखेर ठरलं... काका-बाबा एकाच व्यासपिठावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 06:40 PM2020-11-04T18:40:16+5:302020-11-04T18:43:57+5:30

Congress, politics, Prithviraj Chavan, Vilasrao Patil-Undalkar, Satara area माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक विरोध संपवून पहिल्यांदाच शुक्रवारी, दि. ६ एका व्यासपीठावर येणार आहेत.

Finally decided ... Uncle-Baba on the same platform! | अखेर ठरलं... काका-बाबा एकाच व्यासपिठावर !

अखेर ठरलं... काका-बाबा एकाच व्यासपिठावर !

googlenewsNext
ठळक मुद्देअखेर ठरलं... काका-बाबा एकाच व्यासपिठावर !शुक्रवारी मेळावा : महसुलमंत्रीही राहणार उपस्थित

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक विरोध संपवून पहिल्यांदाच शुक्रवारी, दि. ६ एका व्यासपीठावर येणार आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी तीन वाजता हा मेळावा होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिली.

कॉंग्रेसच्या शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत चव्हाण, शिवराज मोरे, आप्पासाहेब माने, नगरसेवक राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.

सुरेश जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात शुक्रवारी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सातारा येथे आढावा बैठक होईल. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत कऱ्हाड येथील पंकज हॉटेल येथे मेळावा होणार आहे.

तेथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, गृहराज्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत मेळावा होईल. कोरोनामुळे काही मोजक्याच महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Finally decided ... Uncle-Baba on the same platform!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.