रस्त्यावरची लढाई लढणे हिच शिवसेनेच्या कामाची स्टाईल : शंभूराज देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 21:01 IST2025-03-29T21:00:45+5:302025-03-29T21:01:12+5:30

कुणाल कामरा नेहमीच दोन गटात, समूहात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करतो

Fighting on the streets is Shiv Sena's style of work says Shambhuraj Desai | रस्त्यावरची लढाई लढणे हिच शिवसेनेच्या कामाची स्टाईल : शंभूराज देसाई

रस्त्यावरची लढाई लढणे हिच शिवसेनेच्या कामाची स्टाईल : शंभूराज देसाई

प्रमोद सुकरे

 कराड- कुणाल कामरा हा नेहमीच दोन गटात, दोन समूहात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करित आला आहे. तो शिवसेना व भाजपला जाणीवपूर्वक टार्गेट करतोय‌. चुकिची वक्तव्य करुनही आपल्या विधानावर ठाम राहतोय. त्याची खरी बाजू समोर यावी म्हणून पोलिसांनी थर्ड डिग्री चा वापर करून त्याच्याकडून सत्य उगळवून घ्यावे.असे विधान केले होते.त्याचे कोणाशी कनेक्शन आहेत हे समोर यावे हा त्यापाठिमागचा हेतू होता. आणि जशास तसे उत्तर देणे, रस्त्यावरची लढाई लढणे ही तर शिवसेनेची काम करण्याची स्टाईल आहे असे मत राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. 

कराड येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी मुंबई येथील कुणाल कामरा प्रकरणाबाबत छेडले असता मंत्री देसाई बोलत होते.

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जसे गाणे केले आहे. तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही केले आहे.मग शिवसेनाच एवढी आक्रमक का? याबाबत विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, हे खरे आहे.पण भाजपच्या लोकांनी सभागृहात त्याच्यावर हक्क भंग आणला आहे. त्यावेळी त्यांनी परखड मते मांडली आहेत. पण शिवसेनेची काम करण्याची पद्धत नेहमीच वेगळी राहिली आहे.

 सध्या ही बाब न्यायप्रविष्ठ आहे. त्याला ७ तारखेपर्यंत न्यायालयाने दिलासा दिला आहे. पण जेव्हा तो पोलिसांच्या ताब्यात येईल तेव्हा सगळे सत्य बाहेर येईल. कारण आमच्याकडे काहि डिटेल्स उपलब्ध आहेत.त्याला कोणा कोणाचे फोन झालेत, त्याला कार्यक्रमासाठी कोण आर्थिक मदत करते हे सगळे समोर येण्याची गरज आहे. 

महायुतीची ताकद वाढतेय कराड तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याची तुम्हाला संधी होती?पण तुम्ही दुर्लक्ष केले काय? याबाबत छेडले असता महायुतीची ताकद वाढत आहे असे सांगणे मंत्री देसाई यांनी पसंत केले. पण मग प्रवेश कधी आहे? असा सवाल करताच मी कोणाचे नाव घेतलेय काय? असा उलट प्रश्न करताच खसखस पिकली. 

 'सह्याद्री'ची अजून माहिती घेतली नाही नजीकच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. तुमच्या विधानसभा मतदारसंघातील काही गावांचा समावेश सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे तुमची नेमकी काय भूमिका आहे? याबाबत विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, सहकारातील निवडणुका पक्षीय नसतात. पण मी अधिवेशनामुळे मतदार संघाकडे फार नव्हतो. मी अधिक माहिती घेतो मग बोलणे योग्य ठरेल.असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. 

Web Title: Fighting on the streets is Shiv Sena's style of work says Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.