शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पन्नास वर्षांतील मस्तीची व्याजासह फेड करणार -अतुल भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 11:18 PM

मदनराव मोहिते म्हणाले, ‘मागील विधानसभा निवडणुकीत नशिबाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार झाले. ४० वर्षे जे बरोबर होते अशा आनंदराव पाटलांनाही त्यांनी आता अंतर दिले आहे.

ठळक मुद्देजनतेला आता पर्यटन करणारा आमदार नकोय क-हाडला भाजपच्या प्रचारसभेत इशारा

 क-हाड : ‘क-हाड दक्षिणेतील जनतेला आता पर्यटन करणारा आमदार नको आहे. तर बदल घडविणार हवा आहे. जे लोक आमची अवहेलना करतात, जे प्रत्यक्ष पंढरपूरच्या पांडुरंगाच्या अबिराविषयी बोलतात. त्यांची पन्नास वर्षांतील मस्ती ही त्यांना या निवडणुकीत व्याजासह परतफेड करणार आहे,’ असा खणखणीत इशारा कºहाड दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी दिला.

क-हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमधून डॉ. अतुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने गुरुवारी दाखल केला. यानंतर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, विनायक भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सुहास जगताप, विद्या पावसकर, अशोकराव थोरात, शिवसेनेचे उपनेते जयवंतराव शेलार, सुनील पाटील, प्रताप पाटील, शिवाजी जाधव, भीमराव पाटील, कविता कचरे, सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मदनराव मोहिते म्हणाले, ‘मागील विधानसभा निवडणुकीत नशिबाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार झाले. ४० वर्षे जे बरोबर होते अशा आनंदराव पाटलांनाही त्यांनी आता अंतर दिले आहे. काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था ही सध्या आम्हाला कोणी जिल्हाध्यक्ष देता का हो, जिल्हाध्यक्ष, अशी झालेली आहे.’पालिकेला रुपयांचाही निधी दिला नाही...क-हाड शहरात काही दिवसांपासून विकासकामांचे बोर्ड झळकत असलेले पाहायला मिळाले. त्यावर पूर्वीच्या कामांचा उल्लेख करून क-हाडची ओळख म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव लिहिले होते. मात्र, क-हाडची खरी ओळख ही पृथ्वीराज चव्हाण नसून यशवंतराव चव्हाण व पी. डी. पाटील हे आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी पाच वर्षांत पालिकेला एक रुपयाचा निधीही दिला नसल्याचा आरोप उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी केला.माजी आमदार करण्याची वेळपृथ्वीराज चव्हाणांनी पाच वर्षांत काय केले? आता या निवडणुकीच्या निमित्ताने एक संधी व वेळ आली आहे ती म्हणजे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना माजी आमदार करण्याची, अशी टीका डॉ. सुरेश भोसले यांनी केली.स्मशानभूमी बांधणारे जुने आमदार...माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यावर टीका करताना मदनराव मोहिते म्हणाले, ‘आमच्याकडे एक जुने आमदार आहेत. ते केवळ स्मशानभूमी व सांस्कृतिक समाजमंदिरे बांधण्यात पटाईत आहेत. ते रयत संघटनेच्या माध्यमातून आपल्या पुत्राला निवडणुकीच्या रिंंगणात उतरविणार आहेत.’ 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक