पंधरा वर्षांच्या मुलीची आत्महत्या
By Admin | Updated: March 27, 2015 00:22 IST2015-03-27T00:22:59+5:302015-03-27T00:22:59+5:30
आत्महत्येचे कारण पोलिसांना अद्याप समजू शकले नाही

पंधरा वर्षांच्या मुलीची आत्महत्या
सातारा : बांधकामावर काम करणाऱ्या महिलेच्या पंधरा वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना महामार्गाजवळ सुरू असलेल्या बांधकामानजीक घडली. आत्महत्येचे कारण पोलिसांना अद्याप समजू शकले नाही.
ज्योती शंकर सुतार (रा. मातोश्री पार्क इमारतीनजीक, पुणे-बंगलोर महामार्ग) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई मातोश्री पार्क परिसरात इमारतीवर बांधकाम मजूर म्हणून काम करते. या मुलीला वडील नाहीत. गुरुवारी तिची आई परगावी गेली होती, तर सात-आठ वर्षांचा भाऊ शेडवजा घरात तिच्या सोबत होता. दुपारी बाराच्या सुमारास ज्योतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळाने बांधकामावरील एका ठेकेदाराच्या हे लक्षात आले आणि त्याने पोलिसांशी संपर्क साधला. शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)