शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा कुटुंबीयांनी शोधला कचरा संकलनाचा नवा मार्ग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:11 IST

प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश कुलकर्णी या तरुणाच्या मनात आला.

ठळक मुद्देसर्वांचा होकार मिळताच त्याने पौर्णिमा शहा व आई ऋुता मिलिंद कुलकर्णी यांच्या मदतीने कचरा संकलनाचे काम सुरू केले.

सातारा : घंटागाडी दारात येऊनही साताऱ्यातील अनेक नागरिक आजही रस्त्यावर कचरा टाकण्यात धन्यता मानतात. परंतु शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे पंधरा कुटुंबीय याला अपवाद ठरले आहे. येथील रहिवाशांनी अपार्टमेंटमध्येच कचरा संकलनाची व्यवस्था केली असून, याठिकाणी प्लास्किट कचरा, ई-कचरा व भंगार साहित्य वेगवेगळे गोळा केले जाते. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, त्याचे अनुकरण आता इतर नागरिकही करू लागले आहेत.

प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश कुलकर्णी या तरुणाच्या मनात आला.

याचवेळी त्याच्या वाचनात कचरा संकलनाचे काम करणा-या एका तरुणाचा लेखही आला होता. त्यातून प्रेरणा घेऊन हृषीकेशने कचरा संकलनाचे काम सुरू केले. तत्पूर्वी त्याने या नव्या उपक्रमाची अपार्टमेंटमधील रहिवाशांना कल्पना दिली. सर्वांचा होकार मिळताच त्याने पौर्णिमा शहा व आई ऋुता मिलिंद कुलकर्णी यांच्या मदतीने कचरा संकलनाचे काम सुरू केले.

नियोजनानुसार प्लास्टिक, ई-कचरा व भंगार साहित्य वेगवेगळे गोळा केले जाऊ लागले. यासाठी अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावर तीन मोठे डबे ठेवण्यात आले आहेत. तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, सर्वात खालच्या मजल्यावर राहणारे नागरिकही नित्यनेमाने आपला कचरा या डब्यांमध्येच टाकतात.

संकलित होणाºया कच-यापैकी ई-कचरा हा प्रा. संध्या चौगुले यांनी ‘हिरवाई’त सुरू केलेल्या ई-कचरा संकलनकेंद्रात पाठविला जातो. तर प्लास्टिक कच-याचे गठ्ठे तयार करून तो पुण्याला रिसायकलिंगसाठी पाठविला जातो. आतापर्यंत २०० किलो प्लास्टिक हे रिसायकलिंगसाठी पाठविण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर अनेक कुटुंबांनी आता पर्यावरणपूरक चळवळ सुरू केली आहे.

सातारा शहर स्वच्छ व सुंदर राहावे, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी आम्ही कचरा संकलनाचा उपक्रम हाती घेतला. नागरिकांचा या पर्यावरणपूरक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आता झाली आहे.- हृषीकेश कुलकर्णी, सातारा

पर्यावरणाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून आम्ही अपार्टमेंटमध्ये कचरा संकलन केंद्र सुरू केले. तीन वर्षांत आम्ही दोनशे किलो प्लास्टिक समुद्राच्या पोटात जाण्यापासून रोखूू शकलो. आमचा हा उपक्रम पुढे सुरूच राहणार आहे.- पौर्णिमा शहा, सातारा

साताऱ्यातील आदी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी अपार्टमेंटमध्येच कचरा संकलन केंद्र सुरू केले असून, वेगवेगळ्या डब्यात कचरा संकलित केला जातो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका