शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषदेत ‘लाचलुचपत’चा छापा, २५ हजार घेताना महिला अधिकारी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:16 IST

सेवानिवृत्त शिक्षकाच्या निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरी आदेशासाठी घेतली लाच

सातारा : सातारा जिल्हा परिषद इमारतीतील माध्यमिक शिक्षण विभागात सेवानिवृत्त शिक्षकाच्या निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरी आदेशासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखलची प्रक्रिया सुरू झाली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी वैशाली शंकर माने (रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) या वरिष्ठ सहायक महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा २४ वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यामुळे २४ वर्षे सेवा कालावधी पूर्ण असलेला निवड श्रेणी प्रस्ताव तक्रारदार यांच्या शाळेने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल केला होता. या प्रस्तावाच्या मंजुरी आदेशाच्या मागणीसाठी तक्रारदार हे वरिष्ठ सहायक वैशाली माने यांना भेटले होते. त्यावेळी माने यांनी साहेबांना देण्यासाठी म्हणून २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पुणे येथील ‘लाचलुचपत’च्या पथकाने दि. २८ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात सापळा रचला. तसेच २५ हजार रुपयांची मागणी करून स्वीकारताना वैशाली माने यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Zilla Parishad Official Caught Accepting Bribe for Clearance

Web Summary : A female officer in Satara Zilla Parishad was caught red-handed accepting a ₹25,000 bribe. The Anti-Corruption Bureau (ACB) of Pune conducted the raid. The officer demanded money for clearing a retired teacher's proposal, causing a stir in the Zilla Parishad.