शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बुडणाऱ्या मुलांना वाचविताना पित्याचा मृत्यू, कऱ्हाडातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:35 IST

दोन युवकांनी मुलांना वाचविले

कऱ्हाड : कोयना नदीपात्रात बुडणाऱ्या मुलगी आणि मुलाला वाचविताना अभिनंदन रतन झेंडे (वय ३४, रा. शाहू चौक, कऱ्हाड) याचा बुडून मृत्यू झाला. शहरातील जुन्या ब्रिटिशकालीन पुलानजीक गुरुवारी सकाळी ही घटना घडली. मृत अभिनंदन झेंडे याच्यावर कऱ्हाड शहर, तसेच ग्रामीण पोलिस ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू चौकात राहणारा अभिनंदन झेंडे हा गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याची मुलगी व मुलाला घेऊन जुन्या ब्रिटिशकालीन पुलानजीक कोयना नदीपात्रात पोहायला गेला होता. तेथे तिघेही नदीपात्रात उतरले. मात्र, अचानक मुलगी व मुलगा गटांगळ्या खात असल्याचे अभिनंदनच्या निदर्शनास आले. त्याने त्या दोघांकडे धाव घेतली. तेंव्हा मुलीने अभिनंदनला मिठी मारली. तो मुलीला व मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नदीकाठावर थांबलेल्या अमर गायकवाड व रोहन चौगुले या युवकांच्या निदर्शनास आले. त्यांनीही तातडीने नदीपात्रात उड्या घेतल्या. अमर गायकवाड याने मुलीला पाण्यातून ढकलत बाहेर काढले, तर रोहन चौगुले हा मुलाला घेऊन नदीपात्रातून बाहेर आला. मात्र, अभिनंदन झेंडे नदीपात्रातून बाहेर आला नाही. त्यामुळे अमर व रोहन यांनी नदीपात्राकडे पाहिले असता अभिनंदन त्यांना दिसला नाही. तो बुडाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली.घटना समजताच कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी नदीपात्रात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हेअभिनंदन झेंडे याच्यावर कऱ्हाड शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, दहशत माजविण्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई झाली होती. तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो शाहू चौकात वास्तव्यास आला होता, तसेच गत काही वर्षांपासून तो गुन्हेगारीपासून अलिप्त होता. त्याच्या वर्तणुकीतही सुधारणा झाली होती, असे पोलिसांनी सांगितले.

अभिनंदन पट्टीचा पोहणारा, मग बुडाला कसा?नदीपात्रात बुडून मृत्यू झालेला अभिनंदन झेंडे हा पट्टीचा पोहणारा होता. मुले बुडत असताना त्याने दोन्ही मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. इतर दोन युवकांनी त्याला मदतही केली. त्यामुळे मुले वाचली. मात्र, पट्टीचा पोहणारा अभिनंदन पाण्यात कसा बुडाला, असा प्रश्न नातेवाईक उपस्थित करीत आहेत. पोहताना त्याला दम लागला की अन्य काही कारणाने त्याचा मृत्यू झाला, हे शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूKaradकराड