शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद एमआयडीसीतील कंत्राटावरून कामगारांवर जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 19:31 IST

याबाबत अधिक तपास लोणंद पोलीस करीत आहेत

मुराद पटेलशिरवळ : खंडाळा तालुक्यातील लोणंद औद्योगिक परिसरातील कामगार ठेक्याच्या कारणावरून एका कामगार कंत्राटदाराने दुसर्‍या कामगार कंत्राटदाराच्या कामगारांवर प्राणघातक हल्ला करायला लावल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोमेश्वर जि. पुणे येथील कंञाटदारासह इतरांवर लोणंद पोलिस स्टेशनला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोणंद औद्योगिक परिसरातील पुष्पक कंपनीत कामासाठी आलेल्या सात कामगारांवर गुंडानी चाकू तसेच लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात दोन कामगार गंभीर जखमी झालेत. तर पाच कामगार किरकोळ जखमी झालेत. हा हल्ला त्याच कंपनीतील जुना कंत्राटदार अजय तात्याबा सावंत याच्या सांगण्यावरून केला असल्याची तक्रार परप्रांतीय कामगार दिनेश सिंग फुल सिंग (रा. मध्यप्रदेश सध्या रा.गोळेगाव) याने लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे.या घटनेत कामगार दिनेश सिंग फुल सिंग याच्यासह श्रवन कुमार भुईया हे दोघे गंभीर जखमी झाले. तर राजन कोरचे, राम गोपाल साकेत, सुभाष पठारे, राजेश कुमार चौधरी व अन्य असे पाचजण किरकोळ जखमी झाले. जखमीवर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी व लोणंद सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी लोणंद पोलिसात कंत्राटदार अजय सावंत याच्यासह अन्य सहाजणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास लोणंद पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस