शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: लालचुटूक स्ट्रॉबेरीचे दर गडगडल्याने काळवंडली, जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 14:08 IST

कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्यात प्रामुख्याने कुडाळ, आखाडे सोमर्डी, महू, शिंदेवाडी आदी गावांमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जाते. साधारणपणे २० ते २२ हेक्टर जमिनीवर सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरी पिकाची लागण होते. डिसेंबर महिन्यापासून हा हंगाम सुरू होत आहे. पुणे, मुंबई, तसेच जॅमचे चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीकडून याची मागणी होते. सद्य:स्थितीत स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी आहे; मात्र, कंपन्या केवळ वीस ते तीस रुपये दराने खरेदी करीत असल्याने स्ट्रॉबेरी रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.स्ट्रॉबेरीचा दर कोसळला असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक संकटात सापडला आहे. याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे. सध्या स्ट्रॉबेरीला जॅमच्या कंपनीतून मागणी कमी झाली असल्याने स्ट्रॉबेरीचे दर २० ते ३० रुपयांवर आले आहेत. अचानकपणे स्ट्रॉबेरीचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांना तोडून ठेवलेला स्ट्रॉबेरी माल फेकून द्यावा लागला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.स्ट्रॉबेरी या पिकाला कोणत्याही प्रकारचे विमा कवच नसल्याने या नुकसानीची दाद कोणाकडे मागावी, असा सवाल शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना पाणी पुरेल का नाही, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असतानाच स्ट्रॉबेरी पिकाचे दर पडल्याने शेतकऱ्याला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागणार आहे.

स्ट्रॉबेरी पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला लाखो रुपयांचे भांडवल उभे करावे लागते. सरकारकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच स्ट्रॉबेरी पिकाला दिले जात नसून कोणतेही अनुदान दिले जात नाही. अन्य पिकाला दिले जाणारे पीकविमा कवच हे स्ट्रॉबेरी पिकालाही लागू करण्यात यावे. या विमा कवचासाठी जे काही शुल्क भरावे लागेल, ते स्ट्रॉबेरी उत्पादक भरतील. त्यांना या विमा कवचाचा लाभ मिळावा. - रूपेश आंबुले, स्ट्रॉबेरी उत्पादक 

स्ट्रॉबेरी उत्पादकांचे नुकसान करू नयेअवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी पिकाला काहीअंशी फटका बसला. त्यामुळे कारखान्यांनी स्ट्रॉबेरी खरेदीचा दर २५ रुपये किलोवर आणला. गेल्यावर्षी स्ट्रॉबेरीला ५५ ते ६० रुपये दर कारखाने देऊ शकतात, तर यंदा का नाही? कारखान्यांनी शेतकऱ्यांचा माल सन्मानानेच घ्यायला हवा. कष्टाने पिकवलेल्या मालाला कमी दर देऊन त्यांची थट्टा करू नये. जर कारखान्यांना स्ट्रॉबेरी नको असेल तर त्यांनी घेऊ नये; परंतु दर पाडून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. - किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, फळे, फुले सहकारी संस्था, महाबळेश्वर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी