धनंजय मुंडे, रामराजे यांच्या उपस्थितीत खंडाळा-असवलीत शुक्रवारी शेतकरी मेळावा
By Admin | Updated: June 7, 2017 15:49 IST2017-06-07T15:49:24+5:302017-06-07T15:49:24+5:30
साई आंगण व विविध विकासकामांचे उद्घाटन

धनंजय मुंडे, रामराजे यांच्या उपस्थितीत खंडाळा-असवलीत शुक्रवारी शेतकरी मेळावा
आॅनलाईन लोकमत
खंडाळा (सातारा), दि. 0६ : असवली, ता. खंडाळा येथे राष्ट्रवादीतर्फे शुक्रवार, दि.९ रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी संपाच्या पार्शभूमीवर होणाऱ्या या मेळाव्याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले असून, या मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे,ह्ण असे आवाहन आमदार मकरंद पाटील व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांनी केले आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते हा मेळावा होणार आहे. शेतकरी मेळाव्यासह असवली येथील साई आंगण व विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार यासह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.