कल्पक शेतकऱ्यांनी शोधला स्वस्त आणि मस्त फवारणी पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:06 PM2019-01-05T12:06:26+5:302019-01-05T12:07:11+5:30

ग्रासरूट इनोव्हेटर : हा पंप अवघा २० ते ३० रुपयांत तयार होत असून छोट्या शेतीसाठी फायदेशीर ठरला आहे.

Farmers find cheap and cool spray pumps | कल्पक शेतकऱ्यांनी शोधला स्वस्त आणि मस्त फवारणी पंप

कल्पक शेतकऱ्यांनी शोधला स्वस्त आणि मस्त फवारणी पंप

Next

- लक्ष्मण गोरे (बामणोली, जि. सातारा)

पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी पंपाची आवश्यकता असते. हे पंप साधारणपणे ३ हजारांच्या पुढे असतात. यावर शेतकऱ्यांनी स्वस्त आणि मस्त पर्याय शोधून छोटा पंप तयार केला आहे. हा पंप अवघा २० ते ३० रुपयांत तयार होत असून छोट्या शेतीसाठी फायदेशीर ठरला आहे. सातारा जिल्ह्यातील कास, बामणोली, तापोळा परिसरात या पंपाचा वापर करण्यात येत आहे. 

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात, नाचणी व थोड्याफार प्रमाणात गहू आणि इतर भाजीपाला वर्गीय पिके घेतात. पिकांवर रोगांचा कीटनाशक फवारणी करावी लागते. मात्र, यासाठी लागणाऱ्या फवारणी पंपाची किंमत जास्त आहे. कमी प्रमाणात लागवड केलेल्या पिकांवर फवारणी करण्यासाठी मोठा पंप वापररणे अवघड आहे. याकरिता सातारा शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या बामणोली, तापोळा, कास परिसरातील शेतकऱ्यांनी शोधलेला हा स्वस्त व मस्त उपाय अत्यंत फादेशीर ठरत आहे.

बाजारातून मिळणारा छोटा फवारा पंप. या पंपाचा सलूनमध्ये वापर करण्यात येतो. त्याच प्रकारचा हवेचा दाब असणारा छोटा प्रेशर वायपर पंप सध्या बाजारात फक्त २० रुपयांत मिळतो. या पंपाला येथील शेतकऱ्यांनी थंड पेयाच्या रिकाम्या २ ते ३ लिटरच्या बाटलीच्या तोंडाला जोडून सहज कोणतेही औषध किंवा कीटकनाशकाची फवारणी करता येणारा पंप बनविला आहे. याद्वारे शेतकरी घराशेजारील परसबागेत लावलेल्या भाज्या, रताळी, पावटा, वेलघेवडा किंवा थोड्या प्रमाणावरील शेतीसाठी याचा वापर करीत आहेत. आंब्यांचा मोहोर तसेच काही शेतकरी फरसबी व स्ट्रॉबेरी या पिकांवर फवारणी करण्यासाठी तसेच तणनाशक फवारणीसाठीही करीत असल्याची माहिती केळघरचे शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी दिली.

Web Title: Farmers find cheap and cool spray pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.