शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ऊसवाहतुकीची डोकेदुखी, ट्रॉली पलटी होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:04 IST

ओगलेवाडी : सध्या साखर कारखान्यांच्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. बऱ्याच ठिकाणचे ऊस तुटून गेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचा ...

ओगलेवाडी : सध्या साखर कारखान्यांच्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. बऱ्याच ठिकाणचे ऊस तुटून गेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचा ऊस अजूनही शेतात आहे. ऊस घेऊन जाताना अनेक ट्रॉल्या पलटी होत असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहत आहे. नुकसानीबरोबरच ट्रॉली पुन्हा भरण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने ‘चूक चालकाची, भीती मालकाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.साखर कारखान्यांचा ऊस हंगाम सुरु असल्याने ऊस वाहतूक वाढली आहे. फडातून बाहेर निघालेला ऊस कारखान्यापर्यंत सुखरूप पोहोचणे महत्त्वाचे असते. बराचसा ऊस कारखान्यापर्यंत विना अडथळा पोहोचतोय. मात्र काही चालकांच्या चुकीमुळे ऊस ट्रॉली पलटी होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कधी कधी आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे फडातून बाहेर निघालेली ट्रॉली सुखरूप कारखान्यावर जाऊन पोहोचेल काय? अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.खराब रस्ते, क्षमतेपेक्षा जास्त भरलेली वजन, कमकुवत टायर, असमतोल रस्ता, तर कधी वाहनचालकांची चुकी यामुळे ट्रॉली पलटी होण्याचे प्रमाण वाढत आहे. ट्रॉली पलटी झाल्यावर ऊस रस्त्यावर पडून राहतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वजन कमी होण्याचा धोका कायम असतो. त्याचबरोबर ही ट्रॉली पुन्हा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही रकमेची मागणी केली जात आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने