‘फलटणच्या वाळू’वर ‘कोरेगाव महसूल’चा डोळा
By Admin | Updated: January 16, 2015 23:48 IST2015-01-16T20:53:30+5:302015-01-16T23:48:10+5:30
कोरेगावात होतात कारवाई : रात्री होते मोठ्या प्रमाणावर वाहतूक

‘फलटणच्या वाळू’वर ‘कोरेगाव महसूल’चा डोळा
आदर्की : फलटण तालुक्याच्या डोंगराळ भागातील ओढ्याची वाळू धोम-बलकवडी कालव्यावर धुवून कोरेगाव, वाई तालुक्यात सोन्याचे भावाने विकली जाते. ती वाळू कोरेगाव तालुक्यात महसूल खाते पकडते. मग फलटण तालुक्यातील मंडल अधिकारी, तलाठी वर्गानी गांधारीची भूमिका घेतली असल्याची चर्चा सुरू आहे.फलटण तालुक्याच्या पूर्व दक्षिण, पश्चिम भाग डोंगराळ भाग सालपे-जावली पर्यंत ३० ते ४० गावातून डोंगर ते नदी असे पंधरा ते वीस कि. मी. ओढे वाहतात. त्यावर पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट बंधारे, ओढे यामध्ये पावसाळ्यात नैसर्गिक वाळू तयार होऊन ती पाण्याबरोबर वाहून येते. ती वाळू ओढे, डोह व सिमेंट बंधाऱ्यात थांबते. रब्बी हंगामात ज्वारी, गहू व अन्य पिकाला पाणी उपसा झालेनंतर वाळू मोकळी होताच वाळू चोराकडून वाळू उत्खनन करून ती ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे भरून ती माती मिश्रीत वाळू धोम-बलकवडी कालवा, पाझर तलावात मोटर, इंजिन टाकून धुतली जाते किंवा गावातील शेतकरी वर्गास पाच-पन्नास रुपये देऊन मोटारीद्वारे वाळू धुवून वाई, कोरेगाव तालुक्यात सोन्याच्या भावाने विकली जाते.ग्रामीण भागात गवंडीही आता वाळूचा साठा करून ठेवत असल्याचे चित्र दिसत आहे. वाठार-फलटण मार्ग, काळज-हिंगणगाव-सालपे मार्ग, आदर्की मंडलातून मोठ्या प्रमाणात चोरटी वाळूची वाहतूक होऊन तिची कोरेगाव तालुक्यात कारवाई होते. मग मंडल अधिकारी, तलाठी वर्ग गांधारीची भूमिका घेत असल्याची चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)
आदर्की मंडलातून वाहतूकीवर भर
या चोरट्या वाळूची वाहतूक आदर्की मंडलातूनच होत असते. जादा करून रात्रीची वाहतूक होते; परंतु मोकळी वाहने मात्र मार्गावरून जाताना चहापान करून जातात. वाठार-फलटण रस्त्यावर आतापर्यंत बंद पडलेल्या व वाळूचा ट्रक खाली करून पळून गेलेल्या वाहनावरच कारवाई झाली आहे; परंतु चोरट्या वाळूवर कारवाई झाल्याची चर्चा ऐकिवात नाही.