शहरं
Join us  
Trending Stories
1
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
2
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
3
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
4
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
5
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
6
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
7
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
8
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
9
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
10
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
13
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
14
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
15
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
16
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
17
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
18
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
19
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
20
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Pratap Din 2025: किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा अपूर्व उत्साह, शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:20 IST

Shiv Pratap Din 2025 Celebration: लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा अन् पोवाडाही...

सातारा : ढोल-ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष, रोमांच उभा करणाऱ्या तुताऱ्यांचा निनाद, झांजांचा आवाज अन् हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांची अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके.. अशा अलोट उत्साहात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर गुरुवारी शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. यासाठी सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात भवानी मातेची महापूजा करण्यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. तसेच भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.भवानी मातेची आरती झाल्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची वाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. पालखीचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर पुतळा आणि पालखीस पुष्प अर्पण करून भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...’ या ललकारीने वातावरण भारून गेले होते. नंतर पुतळ्यासमोरील चबुतऱ्यावर जिल्हाधिकारी पाटील यांनी ध्वजारोहण केले. तर सातारा पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.यावेळी वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, महाबळेश्वर तहसीलदार सचिन मस्के, वाडा कुंभरोशीच्या सरपंच ज्योती सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाठी - काठी, तलवारबाजी, दांडपट्टा अन् पोवाडाही...छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान-मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी - काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांची पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी माेठी गर्दी झाली होती. तर शाहीर संभाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ हा जोशपूर्ण पोवाडाही सादर केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Pratap Day Celebrated at Pratapgad Fort with Great Fervor

Web Summary : Shiv Pratap Day was celebrated with enthusiasm at Pratapgad Fort. Events included a helicopter flower shower, traditional games, and a palanquin procession. The atmosphere was filled with devotion and historical reenactments, honoring Shivaji Maharaj.