शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Satar Crime: हनीट्रॅपद्वारे एकाकडून ५० हजारांची खंडणी, सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 19:24 IST

मित्राकडून पैसे मागून तक्रारदाराने केली सुटका

जिंती : हनीट्रॅपमध्ये अडकवून एका तरुणाकडून ५० हजार रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या सात जणांविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनीट्रॅपच्या या घटनेनंतर फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी ऋषिकेश प्रल्हाद बोडरे (वय २३, रा. खुंटे, ता. फलटण), धीरज अमोल लगाडे (१९), प्रतीक विजय भंडलकर (वय १९), मोनिका ऊर्फ साक्षी किसन मोहिते (वय २३, मूळ रा. शिंदेवाडी ता. फलटण, हल्ली रा. पाचबत्ती चौक, फलटण), सुहासिनी योगेश अहिवळे (वय २९, मूळ रा. मंगळवार पेठ, फलटण, हल्ली रा. बिरदेवनगर, जाधववाडी, फलटण) अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर दोन जण अल्पवयीन आहेत.फलटण शहर पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ जुलैला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाचबत्ती चौक फलटण येथे साक्षी मोहिते हिने तरुणास ‘मला तुला भेटायचं व पाहायचं आहे,’ असे म्हणून भाड्याने रूम घेत तिथे बोलविले. त्या ठिकाणी तिने इतर सहा साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. या साथीदारांनी तरुणास ‘तू कुठला आहेस, आमच्या बहिणीजवळ काय करतोस,’ असे म्हणून त्याला मारहाण करून ऋषिकेशने तरुणाकडील जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला. तसेच गाडीमध्ये बसवून जुन्या आयटीआय कॉलेजच्या इमारतीजवळ नेऊन दमदाटी व मारहाण केली. 

‘तुझ्यावर साक्षीला सांगून बलात्काराचा गुन्हा दाखल करतो. जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून तरुणास धमकावून व्हिडीओ काढला. यातील एक महिला पोलिस असल्याचे सांगून ‘तू कुणाच्या घरात घुसतो, तुला केसमध्ये गुंतवते, असे म्हणून आरसी बुक काढून घेतले. त्याच्या खात्यावर पैसे आहेत, ते पैसे पोलिसांचे खात्यावर टाकून घ्या व तो पोलिसांना लाच देतो, असे म्हणून यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करून घेते. असे म्हणून धमकावून हाताने मारहाण केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज शिंदे करीत आहेत.

मित्राकडून पैसे मागून तक्रारदाराने केली सुटकाफिर्यादी तरुणास पैशाची मागणी केली त्या वेळी त्याकडे काहीच पैसे नव्हते. पण, या टोळीने कुठूनही पैसे आण नाहीतर सोडणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्याने मित्राकडून ऑनलाइन पैसे मागवले. ते ५० हजार रुपये या टोळक्याने एटीएममधून परस्पर काढून घेतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस