व्यापाऱ्यांकडील साखरसाठा मर्यादेला मुदतवाढ

By Admin | Updated: November 3, 2016 00:34 IST2016-11-03T00:34:14+5:302016-11-03T00:34:14+5:30

सरसकट ५०० टनांची मर्यादा : व्यापाऱ्यांच्या मागणीची केंद्राने घेतली दखल

Extension of sugar limit to traders | व्यापाऱ्यांकडील साखरसाठा मर्यादेला मुदतवाढ

व्यापाऱ्यांकडील साखरसाठा मर्यादेला मुदतवाढ


अहमदनगर : महापालिकेचे पदाधिकारी-अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेवून सिद्धीबागेला पुर्नवैभव मिळवून देण्यासाठी लवकरच आरखडा तयार केला जाईल, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले.
दिवाळी पाडव्यानिमित्त दिल्लीगेट येथील सिद्धीबागेत रसिक ग्रुपतर्फे दीपोत्सव करण्यात आला. यावेळी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, लष्कराच्या बीटीआर केंद्राचे प्रमुख कर्नल गगनसिंग, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, प्रदीप गांधी, पेमराज बोथरा, संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, धनंजय जाधव, सचिन जगताप, जनक आहुजा, रवी बक्षी, आदी उपस्थित होते. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, शारदा होशिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कवडे म्हणाले, जगातील चांगल्या गोष्टीचे अनुकरण केले तरच शहर वैभवशाली होईल. नावीन्यपूर्ण बदल होवून शहराला एक नवीन आयाम प्राप्त होईल. बागेची दुरावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महापौर कदम यांनी दिले. विकासाच्या उपक्रमासाठी उद्योजक पुढाकार घेणार असल्याचे फिरोदिया यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात दिवाळीचा आनंद सिमेवर लढणाऱ्या जवानांना समर्पित करीत जवानांचे प्रतिनिधी म्हणून कर्नल गगनसिंग यांचा मिठाई देवून सत्कार करण्यात आला.
लष्कराच्या वाद्यवृंद पथकाने हिंदी गाणे सादर केली. सुभाष पाटोळे, अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक, विजय आंग्रे, राम ढुमणे, मधुकर वासकर यांनी विविध गिते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. संकेत होशिंग, सुदर्शन कुलकर्णी,विनायक वराडे, दीपाली देऊतकर, मेहमुद शेख, ऋषिकेष येलूलकर यांनी परिश्रम घेतले. प्रा. बाळकृष्ण गोटीपामुल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Extension of sugar limit to traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.