शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Satara: प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजुरीसाठी पाच हजारांची लाच, विस्तार अधिकारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:47 IST

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती

वडूज (जि. सातारा) : खटाव-वडूज पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच रंगेहाथ पकडले. प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजूर करून घेण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. शरण देवीसिंग पावरा (वय ४३, मूळ रा. आंबापूर, ता. शहादा, जि. नंदुरबार, सध्या दहिवडी) असे कारवाई झालेल्याचे नाव आहे.खटाव पंचायत समिती वडूज येथे विस्तार अधिकारी वर्ग ३ म्हणून कार्यरत असलेला शरण पावरा येथे वास्तव्यास आहे. लाचलुचपत विभागाकडे तक्रार केलेला तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२४-२०२५ साठी घरकुल मंजूर झाले होते.या घरकुलाचा हप्ता शरण पावरा याने ७० हजार रुपये मंजूर करून दिले. त्यानंतरचे हप्ते मंजूर करण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. पहिला हप्ता पाच हजार रुपये आणि उर्वरित पाच हजार रुपये पुढील आठवड्यात देण्याचे ठरले होते.त्याप्रमाणे पंचायत समिती आवारात विस्तार अधिकारी पावरा यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.