शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

गॅस गळतीमुळे घरात स्फोट; दाम्पत्य जखमी, गुढेतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:18 IST

Accident Fire Satara : गुढे, ता. पाटण येथे गुरूवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका घरातील सिलेंडरच्या पाईपला गळती लागली. यामुळे घरभर गॅस पसरून अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घराच्या स्वयंपाकगृहाची भिंत कोसळली. तसेच मुख्य दरवाजा तुटून जाऊन समोरच्या घरावर जाऊन आदळला. घरातील इतर साहित्यही फुटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

ठळक मुद्देगॅस गळतीमुळे घरात स्फोट; दाम्पत्य जखमी, गुढेतील घटना भिंत कोसळली; दरवाजा तुटला; कानठीळ्या बसविणारा आवाज

सणबूर : गुढे, ता. पाटण येथे गुरूवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका घरातील सिलेंडरच्या पाईपला गळती लागली. यामुळे घरभर गॅस पसरून अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घराच्या स्वयंपाकगृहाची भिंत कोसळली. तसेच मुख्य दरवाजा तुटून जाऊन समोरच्या घरावर जाऊन आदळला. घरातील इतर साहित्यही फुटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.कृष्णत रामचंद्र पाटील व त्यांची पत्नी संगीता हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुढे येथील सेवानिवृत्त सैनिक कृष्णत पाटील यांचे माडीचे दुमजली घर आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक सिलिंडरच्या टाकीला असलेल्या पाईपला गळती लागून घरभर गॅस पसरला.

सकाळच्या वेळी घराचे दरवाजे, खिडक्या बंद होत्या. त्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला. यावेळी घरात कृष्णत पाटील यांच्यासह त्यांची पत्नी संगीता तसेच त्यांची दोन मुले, सुन आणि नातू असे सर्वजण घरातच होते. अचानक झालेल्या या स्फोटामुळे सर्वजण घाबरले. स्वयंपाकगृहात असणाऱ्ता संगीता यांनी गॅसवर चहा ठेवला होता.

स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. त्यामध्ये संगीता यांच्या अंगावरील साडीने पेट घेतला. मुलगा संदीप याने समय सुचकता दाखवित आग विझविली. मात्र, तोपर्यंत संगीता या भाजून जखमी झाल्या. तर कृष्णत यांच्या डोक्यालाही मार लागला. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्या दोघांना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही तातडीने त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत कृष्णत पाटील यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली आहे.घराचा पत्राही उचकटलागॅसचा स्फोट झाल्यानंतर कृष्णत यांनी प्रसंगवधान राखत घरात वीज बंद केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. स्फोटच्या दणक्याने स्वयंपाकगृहाची भिंत पडली. घराचा दरवाजा तूटून पुढच्या घरावर जावून आपटला. घराच्या माडीवरील घड्याळ, फ्रेमसह इतर वस्तु खाली पडून फुटल्या. तर घराचा पत्राही एका ठिकाणी उचकटला आहे. 

टॅग्स :fireआगAccidentअपघातSatara areaसातारा परिसर